government

दिवाळी आधीच दिवाळी, डिझेल ४ रुपयांनी स्वस्त!

पेट्रोलप्रमाणेच डिझेलचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेताच डिझेल स्वस्त झालंय. केंद्रानं नियंत्रण उठविताच डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलीटर ३ रुपये ३७ पैशांच्या कपातीचा निर्णय जाहीर झाला. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यात स्थानिक कर अथवा व्हॅटचा समावेश नसल्यानं प्रत्यक्षातील कपात प्रतिलीटर चार रुपयांपर्यंत असेल.

Oct 19, 2014, 05:51 AM IST

४०० रूपयांचा LED बल्ब फक्त १० रूपयांत

तब्बल ४०० रूपयांना मिळणारे एलईडी (LED)बल्ब केंद्र सरकार फक्त १० रूपयांत उपलब्ध करून देणार आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Oct 10, 2014, 08:19 AM IST

मोदी-राहुल गांधींची प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांचा सरकारचा दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलीय. या निवडणुकीत दोघांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आमचेच सरकार येण्याचा दावा केला आहे.

Sep 12, 2014, 06:58 PM IST

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास २० हजारांचा दंड?

देशात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन कमी व्हावं यासाठी लवकरच कठोर नियमावली येण्याची चिन्हं असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास तब्बल २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच सिगारेटची सुट्या विक्री करण्यावरही निर्बंध घालावे, असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयासमोर सादर करण्यात आला आहे. 

Sep 10, 2014, 11:24 AM IST

मोदी सरकारनं इंद्रा नुईंना म्हटलं ‘चिनी कम’

‘पेप्सिको’नं आपल्या कोल्ड ड्रिंक पेप्सीमध्ये असलेलं साखरेचं प्रमाण कमी करावं, अशा सूचना मोदी सरकारनं दिल्यात. 

Aug 28, 2014, 09:59 PM IST

भाजपविरोधात आमची लढाई , काँग्रेसची सत्ता येईल - सोनिया गांधी

भाजपविरोधात आमची लढाई सुरुच राहिल. पु्न्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे.

Aug 13, 2014, 02:35 PM IST

मोदी सरकार आल्यानंतर जातीय हिंसेत वाढ - सोनिया

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधलाय. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर अल्पसंख्यांक, जातीय हिंसा वाढल्या असून महिला आणि बालकांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचही त्या म्हणाल्या.

Aug 12, 2014, 04:13 PM IST

वीर पत्नीची ही व्यथा ऐकून न्यायालयही झालं सुन्न

आज कारगिल दिन... त्याच्या विजयाचं सेलिब्रेशन करायला हवंच... पण, याच विजय दिनानिमित्त डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही बातमी... ज्यांनी देशासाठी जीव दिला, त्या जवानांशी आपली सरकारी यंत्रणा किती मुर्दाड आणि बेफिकीर आहे, त्याची ही कथा... गेली ४९ वर्षं एक वीरपत्नी संघर्ष करतेय... तिची व्यथा ऐकून न्यायालयही सुन्न झालं... 

Jul 26, 2014, 10:42 AM IST

खुशखबर : स्वस्त भाज्यांसाठी सरकारची ‘आयडियाची कल्पना’

मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबईत लवकरत ताज्या आणि स्वस्त भाज्या मिळणार आहेत. त्यासाठी सरकारनं नवी आयडिया लढवलीय. 

Jul 25, 2014, 09:41 AM IST

मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची स्थगिती, पण आता नवे दर

मुंबईत मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टानं स्थगिती दिलीय. ९ जुलैपासून रिलायन्सकडून प्रस्तावित केलेली 10 ते 40 रूपये भाडेवाढ सरसकट करता येणार नाही, मात्र 0-3 किमीपर्यंत 10 रूपये. 3-8 किमीपर्यंत 15 रूपये तर 8-11 किमी पर्यंतच्या टप्यासाठी 20 रूपये दर आकारायला परवानगी देण्यात आलीय. ही भाडेवाढ 31 जुलैपर्यंत लागू राहील. 

Jul 7, 2014, 08:34 PM IST