government

`मोदी की रोटी` प्रशासनाने केली बंद

`अब की बार मोदी सरकार` या नरेंद्र मोदी नावाच्या चपातीने सगळ्या देशात अवघ्या दोन दिवसात लोकप्रियता मिळवली. पण प्रशासनाने मात्र ही चपाती बंद करण्याचे आदेश देऊन मोदी की रोटी बंद करून टाकली. वाराणसीच्या चौकाघाट परीसरातील यादव ढाब्याला मोदींच्या चपातीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

May 9, 2014, 04:58 PM IST

खर्डा गावाला गृहमंत्र्यांची भेट, नितीन राऊतांचा सरकाला घरचा आहेर

अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या खर्डा इथं घडलेल्या दलित तरुणाच्या खुनाच्या घटनेनंतर आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आर. आर. पाटलांनी राज्यातल्या प्रत्येक विभागात 6 स्पेशल कोर्ट निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केलीय.

May 6, 2014, 09:48 PM IST

पोलिसांकडून `थर्ड डिग्री`चा वापर, सरकारच्या अंगाशी

माहिती काढून घेण्यासाठी `थर्ड डिग्री`चा वापर करताना आता पोलिसांना जरा सावधच राहावं लागणार आहे.

May 4, 2014, 04:31 PM IST

आता भारत सरकारही सुरू करणार `सत्यमेव जयते`!

एकीकडे अभिनेता आमिर खानचा शो `सत्यमेव जयते` प्रसिद्ध होत असतांना दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या संदेशाचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न करतोय.

Apr 6, 2014, 07:48 PM IST

सरकारची मदत तुटपुंजी, शेतकरी संतापले

खूप वाट पहायला लावून अखेर सरकारनं गारपीटग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलं. पण हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असून या मदतीतून साधा बियाणांचा खर्चही निघणार नाही, मग मशागत, खते, औषधे, मजुरी यांचा खर्च तर दूरच, आमची अशी चेष्टा का करता असा संतप्त सवाल राज्यभरातील गारपीटग्रस्त शेतकरी विचारत आहेत.

Mar 20, 2014, 04:42 PM IST

हिमालय भाड्याने देणे आहे...

लवकर खाजगी कंपन्यांना हिमालय भाड्याने मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. टूरिझमसाठी नेपाळ सरकार सध्या या पर्यायाचा विचार करत आहे.

Mar 13, 2014, 09:01 AM IST

निषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय.

Mar 10, 2014, 08:23 PM IST

सावधान ! `भिशी` काढणाऱ्यांना आता कायद्याचा चाप

तुम्ही `भिशी` काढली आहे का? किंवा काढण्याची तयारी करत असाल तर सावधान. `भिशी` काढणाऱ्यांवर सावकारीविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिले आहे. याची माहिती विधानसभेत त्यांनी दिली.

Feb 25, 2014, 06:25 PM IST

राजे सरकारची `जिंदाल`वर मेहरबानी कशासाठी?

राजस्थानातील भिलवाडामध्ये नवीन जिंदाल यांच्या कंपनीला खाणपट्टे देण्याचं प्रकरण पुन्हा तापू लागलंय. निवडणुकीआधी भाजपनं यासंदर्भात काळी पत्रिका काढली होती.

Feb 25, 2014, 01:55 PM IST

`आयपीएल`ला सुरक्षा देण्यास सरकारचा नकार

आयपीएल सीझन सातच्या सर्व मॅचेस भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका आणि आयपीएलचं वेळापत्रक एकाच कालावधीत असल्याने, आयपीएल मॅचेसना सुरक्षा पुरवणं अशक्य असल्याचं मत गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी व्यक्त केलंय.

Feb 21, 2014, 01:56 PM IST

`आप`चे भाजप-काँग्रेसला खुले आव्हान, सरकार बनवा

दिल्लीत भाजप आणि काँग्रेसनं सरकार बनवून दाखवावं, असं आपच्या नेत्यांनी उघड आव्हान दोन्ही पक्षाला दिले आहे. त्याचवेळी भ्रष्टाचाराविरोधात देशभरात झाडू चलाओ यात्रा सुरू करणार असल्याची माहिती नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Feb 15, 2014, 03:27 PM IST

लतादीदींच्या घरबांधणीला सरकारचं कोर्टात आव्हान

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कोल्हापुरातील घरबांधणी योजनेला सरकारनं कोर्टात आव्हान दिलंय. मंगेशकर यांची जमीन कमाल नागरी जमीन धारणा कायद्याखाली अतिरिक्त ठरविण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी तिथं घरबांधणी योजना राबविण्याचं ठरविलं. मात्र, ही योजना राबविताना त्यांनी अटी पाळल्या नसल्याचं कारण देऊन सरकारनं त्यांना नुकतीच घरविक्री करण्यास मनाई केली. या निर्णयास मंगेशकर यांनी याचिकेद्वारं आव्हान दिलं आहे.

Feb 5, 2014, 11:16 AM IST

शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा शक्य?

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यताय.

Feb 3, 2014, 05:02 PM IST

मुंबईत समुद्रावर एअरपोर्ट बनवण्याचा विचार

महाराष्ट्र सरकारचा नवी मुंबई एअरपोर्टच्या बदल्यात समुद्रात एअरपोर्ट बनवण्याचा विचार सुरू आहे. नवी मुंबई एअरपोर्टसाठी जागा मिळवण्याची डोकेदुखी बंद करण्यासाठी, सरकारने यावर जालीम उपाय काढायचं ठरवलंय. थेट पाण्यावरच एअरपोर्ट बनवण्यासाठी सरकारने कंबर कसलीय.

Jan 29, 2014, 08:45 PM IST

दिल्लीत ‘आप’ बनवणार सरकार... मुख्यमंत्री कोण?

दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी आम आदमी पार्टीकडून दिल्या गेलेल्या वेळेनुसार आजचा शेवटचा दिवस आहे. पार्टीचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी सत्ता स्थापनेसंबंधी सोमवारी निर्णय जाहीर करण्यात येईल, असं म्हटलंय.

Dec 22, 2013, 03:59 PM IST