government

मोदी सरकारविरोधात राजू शेट्टींचा इशारा

 रेल्वे दरवाढीनंतर आता शेतमालाच्या दरावरून मोदी सरकारला शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत. केंद्र सरकारनं शेतमालाच्या ठरवलेल्या किमान आधारभूत किंमतींना दुसरं तिसरं कुणी नव्हे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनंच आक्षेप घेतलाय. एवढंच नव्हे तर आधारभूत किंमत वाढवून दिल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला दिलाय.  

Jun 27, 2014, 07:30 PM IST

1 जुलैपासून राज्यातल्या शाळांचा बेमुदत बंदचा इशारा

1 जुलैपासून राज्यातल्या शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक परिषदेनं सरकारला दिला आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा जाचक आदेश मागं घेण्याची मागणीही या शिक्षक परिषदेची आहे. या प्रकरणी 27 जून रोजी हजारो शिक्षक मुंबईत मोर्चा काढणार आहेत.

Jun 23, 2014, 06:09 PM IST

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसाठी १०० कोटींचं नवं विमान

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल लवकरच 100 कोटींच्या विमानातून प्रवास करणार आहेत. गुजरात सरकार १०० कोटी खर्च करुन पटेलसाठी एअरक्राफ्ट खरेदी करणार आहेत.

Jun 22, 2014, 04:21 PM IST

अखेर अरविंद केजरीवाल सरकारी निवासस्थान सोडणार

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही गेले तीन महिने सरकारी निवासस्थानात राहणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे अखेर आपला मुक्काम हलवणार आहेत. सरकारी घर सोडण्यासाठी विविध स्तरांतून दबाव आल्यानंतर केजरींनी हा निर्णय घेतला आहे.

Jun 14, 2014, 08:32 PM IST

मोदी सरकारकडून युवकांसाठी `अच्छे वाले दिन`!

केंद्रात मोदी सरकार आल्यावर युवा पिढीसाठी नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. मोदी सरकार येत्या 100 दिवसात सरकारी कार्यालयामध्ये असलेले रिकामी पदे भरणार आहेत.

Jun 13, 2014, 08:29 PM IST

बचत वाढविण्यासाठी इन्कम टॅक्सची मर्यादा वाढणार?

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार इन्कम टॅक्सची मर्यादा वाढविण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे तुमचा बचतीवरील टॅक्स वाचण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फायन्सशिअल मार्केट रेग्युलेटर्सचे म्हणणे ऐकले तर ते शक्य होणार आहे.

Jun 11, 2014, 10:09 AM IST

खुशखबर! कार आणि एसटी होणार टोलमुक्त?

राज्यात टोल धोरणात लवकरच बदल करण्यात येणारेय. राज्यसरकार खासगी चारचाकी वाहनांवरील टोल पूर्णपणे माफ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. टोलमधून दिलासा देण्यासाठी राज्यसरकारकडून गांभीर्यानं विचार सुरू आहे. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावरच सरकारकडून सर्वसामान्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

Jun 7, 2014, 11:50 AM IST

पाहा पंतप्रधान मोदींच्या समोरील मोठी आव्हानं

पंतप्रधान पदी नरेंद्र मोदींच्या समोर भारतीय अर्थव्यवस्थेळा रूळावर आणण्याचं मोठं आव्हान आहे. मागील 10 वर्षात जीडीपी दर 5 टक्क्यांहून खाली आले आहेत. जो की एक रेकॉर्ड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान जनतेत आशा निर्माण केलीय आणि आता त्यांच्यासमोर सर्व आव्हानं दूर करण्याचंच मोठं आव्हान आहे.

May 27, 2014, 06:11 PM IST

घोटाळ्यांमुळे यूपीए तोंडावर; पवारांना उपरती!

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (यूपीए) सरकारवर दणकून तोंडघशी पडायची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पराजयाचं विश्लेषण केलंय.

May 21, 2014, 10:50 AM IST

अदाणींना 5500 कोटींची टॅक्स नोटीस

गुजरातचे बिग बिझनेस टायपून आणि देशाचे होऊ घातलेले नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जाणारे उद्योगपती गौतम अदाणींवर यूपीए सरकारने अखेर 5500 कोटी रुपयांची टॅक्स नोटीस बजावली आहे. या कारणानेच जाता जाता केंद्र सरकारने मोदींच्या निकटवर्तीय असलेल्या अदाणी विरूद्ध मुद्दाम नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे.

May 18, 2014, 06:17 PM IST

राजनाथ सिंहांना हवीय नंबर दोनची जागा!

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचं करायचं काय, असं मोठं प्रश्नचिन्ह सध्या भाजपला आणि संघाला पडलंय. तर सरकारमध्ये नंबर दोनची पोझिशन राजनाथ सिंहांना हवीय, असं बोललं जातंय.

May 15, 2014, 05:10 PM IST

मोदींच्या सरकारमध्ये मला मंत्रिपद - रामदास आठवले

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याला केंद्रात मंत्रीपद मिळेल, असा दावा रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी म्हटलंय. एवढच नाही तर मंत्रीपद मिळ्यानंतर आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं साहित्य त्यांच्या बंगल्यातून बाहेर काढू, असं थेट इशारा आठवले यांनी दिलय.

May 14, 2014, 09:55 AM IST