मुंबई, ठाण्यासह, खानदेश, कोकण, मराठवाड्यात आज मतदान
राज्यात 19 जागांसाठी हे मतदान होतंय, खानदेश, कोकण आणि मराठवाड्यासह, मुंबई आणि ठाण्यात आज मतदान होतंय.
Apr 24, 2014, 07:13 AM ISTलोकसभा निवडणूक - यांनी बजावला मतदानाचा हक्क
राज्यात मतदानाचा उत्साह आहे. आतापर्यंत चांगले मतदान झाले आहे. सरासरी 19 ते 22 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. 16 लाख 47 हजार मतदार आहेत. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर, कॉंग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क बजावला.
Apr 17, 2014, 12:23 PM ISTशेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे
राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.
Mar 12, 2014, 07:15 PM ISTराज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.
Mar 12, 2014, 03:47 PM ISTमुलीच्या लग्नाआधीच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं
मराठवाडयात गारपीट लोकांच्या जीवावर उठलीय. आत्तापर्यंत गारपीटीनं २० पेक्षा जास्त बळी घेतलेत. २०० पेक्षा जास्त जनावरं मेलीत. या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे. हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करुन जीवन संपवल्यानं परिसरालाच धक्का बसलाय.
Mar 10, 2014, 09:23 PM ISTनिषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!
गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय.
Mar 10, 2014, 08:23 PM ISTमराठवाडा, विदर्भ वेगळी राज्य करा - पासवान
लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी मराठवाडा आणि विदर्भ वेगळा करण्याची मागणी केली आहे.
Feb 21, 2014, 03:32 PM ISTविधानसभेत काँग्रेसलाच अशोक चव्हाण यांनी पकडले कोंडीत
मराठवाड्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानसभेत अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचा पैसा जातो कुठे हेच समजत नाही, असा काँग्रेस आघाडी सरकारला अशोक चव्हाण यांनी घरचा आहेर दिला आहे.
Dec 19, 2013, 11:22 PM ISTमराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!
मराठवाड्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे त्यात समन्यायी पाणीवाटप करण्याची सातत्याने मागणी होतेय. याच प्रश्नावर आता राज्य सरकार ‘आस्ट्रेलियन’ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.
Dec 5, 2013, 10:12 AM ISTमराठवाड्यासाठी खूशखबर... जायकवाडीचा पाणीसाठा वाढला!
दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ३२.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2013, 06:01 PM ISTपावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच
पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..
Sep 30, 2013, 06:28 PM ISTमराठवाड्यावर वरुणराजा रुसलेलाच!
राज्यात सगळीकडेच पावसानं थैमान घातलं असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलाच नाही.
Jul 24, 2013, 10:24 AM ISTराज्यात पाऊस, मराठवाडा कोरडा!
राज्यात जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झालाय. मात्र, मराठवाड्यातल्या एकूण प्रकल्पात फक्त 6 टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे जायकवाडी, येलदरी, मांजरा, सिद्धेश्वर, माजलगाव आणि निम्न तेरणा आदी धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.
Jul 3, 2013, 08:54 PM ISTअशोक चव्हाणांची राजकारणात पुन्हा आक्रमक सुरूवात?
आजपर्यंत राज्याच्या राजकीय पटलावरून आणि मराठवाड्यातील असूनसुद्धा मराठवाड्याच्या राजकारणातून जवळपास गायब झालेले अशोक चव्हाणांनी आज पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत दिले.
Jun 17, 2013, 05:46 PM ISTराहुल गांधी आज मराठवाडा दौऱ्यावर...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आणि मजुरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.
May 28, 2013, 12:56 PM IST