mumbai high court

गणित पर्यायी विषय बनवता आला तर विद्यार्थ्यांना मदत होईल - हायकोर्ट

गणित हा जर पर्यायी विषय बनवता आला तर अनेक विद्यार्थ्यांना पद्वीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्यास मदतच होईल, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय. तसेच यावर तज्ञांची मतं जाणून घेऊन २६ जुलैला होणा-या पुढच्या सुनावणीला उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

Jun 20, 2017, 08:36 AM IST

घोडबंदर परिसरात नव्या बांधकामांना परवानगी नको : कोर्ट

घोडबंदर परिसरातल्या नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे दिलाय. पिण्यासाठी पुरेसे पाणी नसल्यानेमुळे हा निर्णय देण्यात आलाय.

May 5, 2017, 07:13 PM IST

बिल्कीस बानो प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय ठेवला कायम

गुजरातमध्ये 3 मार्च 2002 साली झालेल्या दंगल प्रकरणातील पीडित बिल्कीस बानो प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय.

May 4, 2017, 11:06 PM IST

मराठा आरक्षणाचा विषय मागासवर्गीय आयोगाकडे?

मराठा आरक्षण विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती. 

May 2, 2017, 11:02 PM IST

मराठा आरक्षण : राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश

मराठा आरक्षण विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती. त्यावरून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही, हा मुद्दा प्रवर्ग मागास वर्गीय आयोगाकडे द्यावा की नाही, याचे स्पष्टीकरण सरकारने गुरूवारपर्यंत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

May 2, 2017, 07:13 PM IST

'बलात्कार पीडित महिलेच्या पोटी जन्माला येणाऱ्या आपत्यांबाबत कल्याणकारी योजना आहे का'

बलात्काराच्या घटनेनंतर पीडित महिलेच्या पोटी जन्माला येणा-या आपत्याबाबत राज्य सरकारची काही कल्याणकारी योजना आहे का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. 

Apr 20, 2017, 08:17 AM IST

एसटी सेवा सुरु करा अन्यथा वसई-विरार पालिका बरखास्त करु, उच्च न्यायालयाने फटकारले

वसई-विरार भागातील एसटी फेऱ्या सुरु करा अन्यथा पालिका बरखास्त करण्यात येईल. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रशासक बसवू, अशा कडक शब्दात आज मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला फटकारले.

Mar 31, 2017, 05:45 PM IST

संपकरी डॉक्टरांना हायकोर्टाचा दणका

संपकरी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा जोरदार झटका दिलाय.  उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. 

Mar 24, 2017, 04:26 PM IST

मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, डॉक्टरांना कोर्टानं फटकारलं

मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, डॉक्टरांना कोर्टानं फटकारलं

Mar 21, 2017, 06:15 PM IST

निवासी डॉक्टरांना संपावरून हायकोर्टाने फटकारलं

 न्यायालयाने सुरूवातीला निवासी डॉक्टरांची बाजू व्यवस्थित ऐकून घेतल्यानंतर फटकारलं आणि निवासी डॉक्टरांच्या संपावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Mar 21, 2017, 02:35 PM IST

व्हिक्टोरिया चालकांना रिक्षा टॅक्सी परवाने द्या - उच्च न्यायालय

शहरातील व्हिक्टोरिया चालकांना रिक्षा टॅक्सी परवाने देण्याचा विचार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.बंदी घालण्यात आलेल्या व्हिक्टोरिया मालकांचं योग्य पुनर्वसन होणं गरजेचं आहे, असं उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Mar 17, 2017, 09:24 AM IST

सर्वसामान्य मुंबईकरांनी चालायचं कुठे? हायकोर्टाचा सवाल

मुंबईतले रस्ते गाड्यांनी आणि फुटपाथ फेरीवाल्यांनी भरलेत, सर्वसामान्य माणसानं चालायचं कुठे? अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालय़ाने शहरातील अतिक्रमणांना फटकारलय. 

Mar 3, 2017, 03:51 PM IST

नालेसफाई घोटाळ्याचा तपास एसीबीकडे नाही

मुंबईतील नाले सफाई घोटाळ्य़ाचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.

Mar 1, 2017, 05:49 PM IST