पुढील महिन्यात मोदींच्या मंत्रीमंडळाचा विस्तार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार हे सांगण्यात येतंय. यानुसार पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकतात.
Jul 28, 2014, 12:03 PM ISTपंतप्रधान मोदींनी लॉन्च केली MyGov वेबसाइट
केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होऊन आज 2 महिने पूर्ण झालेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता आणि सरकारमधला दुरावा कमी करण्यासाठी एक नवं वेबपोर्टल लॉन्च केलंय. mygov.nic.in असं या वेबसाइटचं नाव आहे.
Jul 27, 2014, 10:22 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल
ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल झालेत. आजपासून या परिषदेला सुरुवात होतेय. मोदींसह ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र असलेल्या ब्राझिल, रशिया, चिन आणि दक्षिण आफ्रिकाचे अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत.
Jul 15, 2014, 12:24 PM ISTराजनी उडवली नरेंद्र मोदींची खिल्ली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 08:50 PM ISTराज ठाकरेंनी उडवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जोरदार खिल्ली उडवली. कालपर्यंत मोदींची स्तुती करणारे राज ठाकरे आता चक्क मोदींच्या विरोधात भूमिका घेत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
Jul 11, 2014, 03:05 PM ISTविकासाला हातभार लावणारे रेल्वे बजेट - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अर्थसंकल्पाचे स्वागत केलेय. या अर्थसंकल्पात देशातील सर्वच घटकाचा विचार करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलेल्या बजेटमुळे रेल्वेचा विस्तार होणार असून, विकासही साधला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली.
Jul 8, 2014, 03:30 PM ISTपवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात पवारांनी फेसबुकवर माहिती दिलीय. लांबलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Jul 1, 2014, 01:05 PM ISTमुंडेंच्या अपघाताची CBI चौकशीबाबत मोदी निर्णय घेतील - गडकरी
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला झालेल्या अपघाताच्या CBI चौकशीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असं नितीन गडकरींनी म्हटलंय. काल आपण मोदी आणि मुंडेंच्या कुटुंबियांशी चर्चा केली.
Jun 5, 2014, 10:50 PM ISTकलम ३७० वादः जम्मू-काश्मीर ओमर यांच्या वडिलांची जहागीर नाही - संघ
नरेंद्र मोदी सरकारमध्ये नवनियुक्तम पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कलम ३७० वर केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेले राजकीय वादळ आता क्षमण्याची चिन्ह कमी दिसत आहेत.
May 28, 2014, 12:58 PM ISTपाहा पंतप्रधान मोदींच्या समोरील मोठी आव्हानं
पंतप्रधान पदी नरेंद्र मोदींच्या समोर भारतीय अर्थव्यवस्थेळा रूळावर आणण्याचं मोठं आव्हान आहे. मागील 10 वर्षात जीडीपी दर 5 टक्क्यांहून खाली आले आहेत. जो की एक रेकॉर्ड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान जनतेत आशा निर्माण केलीय आणि आता त्यांच्यासमोर सर्व आव्हानं दूर करण्याचंच मोठं आव्हान आहे.
May 27, 2014, 06:11 PM ISTशाहरूख आपल्या शब्दाचा पक्का नाही
नरेंद्र मोदींच्या विरोधात देश सोडण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये ट्विट करून शाहरूख खान देखील चांगलीच टिवटिव करत होता. `नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देश सोडून देऊ`, अशी भीष्म प्रतिज्ञा शाहरूखने सात महिन्यांपूर्वी केली होती. पण आता मात्र मी असं बोललोच नाही, असा दावा शाहरूखने केला आहे.
May 20, 2014, 05:42 PM ISTमोदींच्या सुरक्षेसाठी हायटेक यंत्रणा रेडी
आतंकवाद्यांच्या हिट लिस्टवर असणारे देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या आधी कुठल्याच पंतप्रधानांना जी सुरक्षा देण्यात आली नव्हती, अशी सुरक्षा देण्यात येणार आहे. व्हीव्हीआयपी सिक्युरिटी देणारी यंत्रणा `एसपीजी`ने निर्णय घेतला आहे की, मोदींच्या सुरक्षेसाठी ५०० जावानांचा ताफा तैनात करण्यात येणार आ
May 19, 2014, 08:19 PM ISTनरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर राहणार कुठे?
देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 7 रेसकोर्सवर राहणार आहेत. तसेच मोदींचं नवीन कार्यालय हे दिल्लीतील रायसीना हिल्स येथील साऊथ ब्लॉकमध्ये रुम नंबर 151 हे असणार आहे.
May 18, 2014, 05:01 PM ISTनरेंद्र मोदीच्या पत्नीने कोणाला टाकले अडचणीत?
पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांचे कुटूंबिय यांना सुरक्षा देण्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) संभ्रमात पडलय. याला कारणही तसंच आहे. मोदी यांनी बडोदामधून उमेदवारीचा अर्ज भरताना आपण स्वतः विवाहित असल्याचं शपथपत्र दिल होतं. त्यामध्ये मोदी यांनी पत्नीचं नाव जशोदाबेन सांगितलं.
May 8, 2014, 07:00 PM ISTथायलंडच्या पंतप्रधान यिंग्लुक शिनावात्राची हकालपट्टी
थायलंडच्या पंतप्रधान यिंग्लुक शिनावात्रा यांची सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी हकालपट्टी करण्यात आली आहे. बँकाकमधील न्यायालयाने ही हकालपट्टी केली आहे.
May 8, 2014, 02:02 PM IST