supreme court

परिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील - सुप्रीम कोर्ट

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात बँक आणि एटीएमबाहेर असलेल्या रांगा चिंतेचा विषय असून परिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील अशी भीती सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलीय. 

Nov 19, 2016, 10:13 AM IST

गर्भलिंगनिदानासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची सर्च इंजीन्सला तंबी

लिंगनिदानासंदर्भातली कुठलीही माहिती आणि जाहिराती सगळ्या सर्च इंजिन्सनी ताबडतोब डिलीट करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. 

Nov 17, 2016, 09:25 AM IST

नोटबंदीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

ही बंदी घातल्यानंतर सामान्य माणसांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे, हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयामुळे सामान्य माणसाला नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

Nov 15, 2016, 10:02 PM IST

काळवीट शिकार प्रकरण : सलमानच्या अडचणी पुन्हा वाढणार?

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टच्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारची याचिका स्वीकारली आहे. सुप्रीम कोर्टात आता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सलमान खानला नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.

Nov 11, 2016, 06:39 PM IST

भारत-इंग्लड पहिल्या कसोटीवरील संकट दूर

 उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत वि इंग्लंड कसोटीवरील संकट टळलेय. सुप्रीम कोर्टाने राजकोट कसोटीसाठी ५६ लाख रुपयांचा निधी देण्यास परवानगी दिलीये.

Nov 8, 2016, 04:46 PM IST

निधी वाटपाच्या परवानगीसाठी बीसीसीआय कोर्टात

 बुधवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लडविरोधातल्या कसोटी सामन्याआधी निधी वाटपाची परवानगी मिळावी यासाठी BCCIनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. 

Nov 8, 2016, 12:06 PM IST

दिल्ली प्रदूषणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी

 दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून गठित प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलंय. याबाबत मंडळाने कोर्टाला सुनावणी घेण्याची विनंती केली. 

Nov 8, 2016, 11:56 AM IST

कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर आनंदाची बातमी

कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर सुप्रीम कोर्टानं आनंदाची बातमी दिली आहे. कंत्राट पद्धतीवर काम करत असलेल्या देशभरातील लाखो कामगारांना कायम कामगारांइतकाच पगार द्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

Oct 29, 2016, 09:37 AM IST

कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी

कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहूर्तावर सुप्रीम कोर्टानं आनंदाची बातमी दिलीये. 

Oct 28, 2016, 09:53 AM IST

दलित- मुस्लिम समुदायावर हल्ले; केंद्रासह 6 राज्यांना भूमिका मांडण्याचे SCचे आदेश

गोरक्षकांकडून देशभरात दलित आणि मुस्लिम समुदायावर हल्ले केले जात असल्याचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आला. यासंबंधी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि गुजरात, महाराष्ट्र, युपी, झारखंड, कर्नाटक आणि राजस्थान सरकारला ७ नोव्हेंबर रोजी भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत.

Oct 21, 2016, 11:21 PM IST

बीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी

राज्यांची क्रिकेट असोसिएशन जोपर्यंत लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्याचं आश्वासन देत नाहीत तोपर्यंत त्यांना पैसे देऊ नका आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका, असे आदेश सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत. 

Oct 21, 2016, 04:09 PM IST

'धर्मगुरूं'वर कारवाई करता येईल का? - सुप्रीम कोर्ट

धर्मगुरूंचा त्या त्या धर्मावर चांगला पगडा असतो. त्यामुळे धर्मगुरूंनी केलेल्या आवाहनाचा राजकारणात राजकीय नेत्यांना चांगला लाभ मिळतो. निवडणूकीत धर्मगुरूंनी एखाद्या उमेदवारासाठी मतदान करण्याचे आवाहन केले तर धर्मगुरूंना जबाबदार ठरवण्यात येते का? त्यांच्यावर कारवाई करता येईल का? यावर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. धर्मगुरूंवर कोणत्या नियमांतर्गत कारवाई करता येईल, असा सवाल सुप्रीम कोर्टानं केला आहे.

Oct 20, 2016, 11:27 AM IST