zee24taas

गुड न्यूज: मंगळावर पाणी सापडल्याचा नासाचा दावा

मंगळ ग्रहावर भविष्यात मानवी वस्ती असण्याची कल्पना आता केवळ कथांमध्येच राहणार नाही. कारण मंगळावर पाणी असल्याचा शोध लागलाय. अमेरिकी अंतरिक्ष एजंसी नासानं सोमवारी ही माहिती दिली.

Sep 29, 2015, 09:24 AM IST

भाजपाचे जेष्ठ नेते रामभाऊ कापसे यांचं निधन

भाजपाचे जेष्ठ नेते आणि एक उत्तम संसदपटू असलेले रामभाऊ कापसे यांचं आज पहाटे 4 वाजता निधन झालं. वयाच्या 82 व्या वर्षी कल्याणमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 11 वाजता रामभाऊंची अंत्ययात्रा निघणार आहे.

Sep 29, 2015, 09:03 AM IST

मास्टर ब्लास्टर सचिनच्या आवाजात स्वच्छ भारत अभियानाचं अँथम!

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्याला आता गातांना दिसणार आहे. सचिननं नुकतंच स्वच्छ भारत अभियानाचं अँथम रेकॉर्ड केलं. सचिन आज ट्विटरवरून ही माहिती दिलीय. स्वच्छ भारत अभियानासाठी आपली आणखी एक मदत असल्याचं त्यानं सांगितलं.

Sep 28, 2015, 03:47 PM IST

राज्यात गणपती विसर्जनाला गालबोट 15 जणांचा बुडून मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील ८०१ गणेश मंडळांनी वाजत गाजत शांततेनं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथं गणेश विसर्जनादरम्यान १७ वर्षीय सुनील शिंगाडे या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. 

Sep 28, 2015, 01:48 PM IST

PSLV C-30 चं श्रीहरीकोट्याहून यशस्वी उड्डाण, अॅस्ट्रोसॅटचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोनं अंतराळ मोहीमेत पुन्हा एकदा भारताचा झेंडा रोवला आहे. भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचं आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 'अॅस्ट्रोसॅट' ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा आहे. अंतराळात वेधशाळा असलेला भारत हा चौथा देश आहे.

Sep 28, 2015, 11:21 AM IST

व्हिडिओ - लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसाकडून तरुणीला मारहाण

लालबागच्या राजाचा आज सकाळीच विसर्जन झालंय. मुंबईत प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या दरबारात लाखोंच्या संख्येनं भाविक या 10 दिवसांत दर्शनासाठी येतात. सुरक्षेसाठी तिथं पोलीस कर्मचारीही उपस्थित असतात. पण दर्शनासाठी आलेल्या एका तरुणीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय.

Sep 28, 2015, 10:46 AM IST

70 वर्षात दहशतावादाचा अर्थ यूएननं ठरवला नाही, पंतप्रधानांची टीका

बरोबर एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी तशीच वाट पाहिली. तिच तारीख, तोच महिना... तब्बल 18 हजारांहून अधिक भारतीयांचा तोच उत्साह...फक्त जागा बदलली होती. यावेळी सॅन हौजेचं सॅप सेंटर तर गेल्यावर्षी न्यूयॉर्कचा मॅडिसन स्क्वेअर... 

Sep 28, 2015, 09:42 AM IST