Driving Licence नसलं तरीही वाहतूक पोलीस तुमचं काहीही वाकडं करू शकतं नाही, कारण...

घरातून निघताना जर तुमच्या वाहनाची कागदपत्रे घरीच विसरलात. आणि नेमंकच तेव्हा तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवले आणि तुम्हाला चलन भरायला सांगितले. तर तेव्हा घाबरून जाऊ नका, कारण

Updated: Aug 14, 2022, 03:09 PM IST
Driving Licence नसलं तरीही वाहतूक पोलीस तुमचं काहीही वाकडं करू शकतं नाही, कारण... title=

Digilocker App: घरातून निघताना जर तुमच्या वाहनाची कागदपत्रे घरीच विसरलात. आणि नेमंकच तेव्हा तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवले आणि तुम्हाला चलन भरायला सांगितले. तर तेव्हा घाबरून जाऊ नका, कारण आता तुमच्याकडे जरी ड्रायव्हिंग लायसन्स नसले तरी वाहतूक पोलिस चलन कापू शकणार नाहीत. खरंतर आज आम्ही तुम्हाला अशाचं अॅपबद्दल सांगणार आहोत. जेणेकरुन ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसेल तरी तुमचा आता खिसा रिकामी होणार नाही. 

आम्ही ज्या अॅपबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे Digi Locker. हे अॅप गेल्या काही काळापासून बाजारात खूप लोकप्रिय झाले आहे.   Digi Locker अॅप  हे सरकार मान्यताप्राप्त असून तुम्हाला ते Google Play Store आणि App Store वर मिळेल.  या अॅपमध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्डसारखी आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या हार्ड कॉपी ठेवण्याची गरज भासणार नाही. या अॅपचा खूप उपयोग होतो.