Water Cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागात येणार नाही पाणी

Mumbai News : मुंबईकरांना रविवारच्या दिवशी लोकलच्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागतो. पण मुंबईकरांनो आज आणि उद्या 29 आणि 28 नोव्हेंबरला तुम्हाला पाण्याचा 'मेगाब्लॉक'चा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आज आणि उद्या पाणी जपून वापरा.   

Updated: Nov 29, 2022, 08:46 AM IST
Water Cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागात येणार नाही पाणी title=
Water Cut in Mumbai 29 to 30 novmber and Find out in which area water will not come nmp

Water Cut in Mumbai : काय नळ सुरु केला आणि पाणीच नाही. मुंबईकरांनो (Mumbai News) तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांनो आज आणि उद्या 29 आणि 28 नोव्हेंबरला तुम्हाला पाण्याचा 'मेगाब्लॉक'चा सामना करावा लागणार आहे. म्हणजे आजपासून  24 तास पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) बंद असणार आहे. पवई (Powai) आणि वेरावल्ली (Veravali) तलावातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या (Pipeline) दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Water Cut in Mumbai 29 to 30 novmber and Find out in which area water will not come)

कधी सुरु होणार काम?

या कामाला 29 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी हे काम संपणार आहे. त्यामुळे काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी सोडण्यात त्यामुळे मुंबईकरांनो याचा परिणाम 12 विभागांतील पाणीपुरवठ्या होणार आहे. या विभागात तुमचा परिसर येणार आहे जाणून घ्या. 

तुमच्या विभागात पाणी येणार आहे की नाही? 

L विभाग पाणीपुरवठा बंद : अशोक नगर, संजय नगर, सांता नगर, साने गुरुजी नगर, हिमालय सोसायटी, मिलिंद नगर, आंबेडकर नगर, सुंदर नगर, असल्फा, यादव नगर, साकीनाका पोस्ट ऑफिस, दुर्गामाता मंदिर मार्ग, जंगलेश्वर महादेव मंदिर मार्ग, लोयलका, भानुशाली वाडी, कुलकर्णी वाडी, चर्च गल्ली, संघर्ष नगर

N विभाग पाणीपुरवठा खंडित : राम नगर, हनुमान नगर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, शंकर मंदीर, जय मल्हार नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षा नगर, ए व बी कॉलनीचा काही परिसर, डी आणि सी म्युनिसिपल कॉलनी, रायगड विभाग, आनंदगड, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृत नगर, इंदिरा नगर 1  आणि 2, अमिनाबाई चाळ, गणेश मैदान, मौलाना कंपाऊंड, हरिपाडा, जगदुषा नगर, कठोडीपाडा, भीमानगर, अल्ताफनगर, गेल्डानगर, गोळीबार मार्ग, नवीन दयासागर, जवाहरभाई प्लॉट, सेवानगर, ओ. एन. जी. सी. कॉलनी, माझगाव डॉक कॉलनी, गंगावाडी गेट नंबर 2, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, साईनाथ नगर, पाटीदार वाडी, रामाजी नगर, भटवाडी, बर्वेनगर, काजू टेकडी, अकबरलाला कंपाऊंड, आझादनगर, पारसी वाडी, सोनिया गांधी नगर, खाडी मशीन, गंगावाडी 

S विभाग पाणीपुरवठा खंडित : गौतम नगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे मार्ग, पवई 

K पूर्व विभाग 29 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित : बांद्रेकर वाडी, फ्रान्सिस वाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर 

K पूर्व विभाग 29 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित : वांद्रे प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर,पास्कल कॉलनी, शंकर वाडी 

K पूर्व विभाग 29 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित :  पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटील वाडी, हंजर नगर, झगडा पाडा, पारसी कॉलनी, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ, गुंदवली आझाद मार्ग, सर्वोदय नगर 

K पूर्व विभाग 29 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित : विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, पंथकीबाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळडोंगरी, जीवा महाले मार्ग, साईवाडी, जीवनविकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, चकाला गावठाण, डोमेस्टीक एअरपोर्ट, विलेपार्ले

P दक्षिण विभाग 29 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित : बिंबीसार नगर 

पी दक्षिण विभाग 29 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित : राम मंदीर, गोरेगाव पश्चिम

K पूर्व विभाग 29 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित : ओल्ड नागरदास मार्ग, मोगरपाडा, न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलस वाडी परिसर अंबावाडी, गुंदवली 

K पूर्व विभाग 30 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित : शिव टेकडी, दत्त टेकडी, मजासगाव टेकडी, आनंद नगर, समर्थ नगर, स्मशान टेकडी, अग्रवाल नगर, श्याम नगर, मेघवाडी, नटवर नगर, रोहिदास नगर, गांधी नगर, सरस्वती बाग, जोगेश्वरी स्थानक मार्ग, नवलकर वाडी, एच. एफ. सोसायटी मार्ग, साईवाडी, मोगरापाडा, इंदिरा नगर 

K पूर्व विभाग 30 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित : महाकाली मार्ग, पेपरबाक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर-ए-पंजाब, बिंद्रा संकुल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर, पूनम नगर, गोनी नगर, पी. एम. जी. पी. कॉलनी, कोकण नगर, संजय नगर 

K पूर्व विभाग 30 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित : चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक  1 व 2, शिवाजी नगर, ए. के. मार्ग, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, मरोळ-मरोशी मार्ग, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांतीनगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी कॉलनी

K पूर्व विभाग 30 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित : मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक 1 ते 23, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, उपाध्याय नगर, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा 

K पूर्व विभाग कमी दाबाने पाणीपुरवठा : विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, मरोळ-मरोशी मार्ग, गावदेवी, मरोळ गाव, चर्च मार्ग, कदम वाडी, भंडारवाडा 

K पूर्व विभाग कमी दाबाने पाणीपुरवठा : सीप्झ, आंतरराष्ट्रीय विमानतळ 

H पूर्व विभाग 30 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित : टीपीएस III, टीपीएसV, आगरीपाडा, सेवा नगर, हनुमान टेकडी, 7 वा रस्ता, खार सबवे, डवरी नगर, शिवाजी नगर, गावदेवी, वाकोला पाईप लाईन मार्ग, नेहरु मार्ग 

H पश्चिम विभाग 29 आणि 30 नोव्हेंबरला पाणीपुरवठा खंडित : सांताक्रुझ (पश्चिम), गजधरबंध, खार पश्चिमचा पश्चिम रेल्वे आणि डॉ. आंबेडकर मार्ग मधील काही परिसर 

H पश्चिम विभाग 29 आणि 30 नोव्हेंबरला कमीदाबाने पाणीपुरवठा : वांद्रे (पश्चिम)