सिडनी : दारू तसेच सिगारेटपेक्षा कॅन्सर होण्याचा जास्त मोठा धोका आता चुंबनाचा झाला आहे. तुम्ही जेवढ्या जास्त लोकांचे चुंबन घ्याल तेवढा तुम्हाला कॅन्सर होण्याच्या धोक्यात वाढ होईल.
ह्युमन पॉपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) चा प्रसार चुंबनावाटे जास्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे डोके आणि मानेचा कॅन्सर हा धुप्रपानापेक्षा चुंबनाने जास्त होऊ शकतो असे डॉक्टरांचेही मत झाले आहे.
तसेच चुंबनाने एचपीव्ही चा प्रसार खूप प्रमाणात वाढू शकतो.जर तुम्हाला फुफुसांमध्ये या व्हायरसचे संक्रमण झाले तर तुम्हाला कॅन्सर होण्याचे प्रमाण 250 पटीने वाढते असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाच्या रॉयल डार्विन हॉस्पिटलमधील डोके आणि मानेचा कॅन्सर चे सर्जन महिबन थॉमस यांनी केले आहे.
एचपीव्ही या व्हायरसमुळे महिला तसेच पुरूष दोघांनाही धोका आहे. या व्हायरसचे अनेक प्रकार आहेत पण आठ प्रकार असे आहेत ज्यामुळे माणसाला कॅन्सर होऊ शकतो.
ऑस्ट्रेलियात 2011 या वर्षात किमान 3121 लोकांमध्ये विविध कारणांनी झालेल्या डोक्याच्या आणि मानेच्या कॅन्सरवर उपचार केले होते. ऑस्ट्रेलियन सरकारने कॅन्सरवर प्रतिबंध लावण्यासाठी 12 ते 13 वयोमर्यादेतील मुला-मुलींना लसीकरण करणे अनिवार्य केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.