मोदींचे भाषण म्हणजे प्रवचन - काँग्रेस

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त आज विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. मोदींच्या या कार्यक्रमावर काँग्रेसनं टीका केलीय. हे तर मोदींचं प्रवचन, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी टोला लगावलाय. तर भाजपनंही काँग्रेसला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. 

Updated: Sep 5, 2014, 02:06 PM IST
मोदींचे भाषण म्हणजे प्रवचन - काँग्रेस title=

नवी दिल्ली, मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त आज विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. मोदींच्या या कार्यक्रमावर काँग्रेसनं टीका केलीय. हे तर मोदींचं प्रवचन, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी टोला लगावलाय. तर भाजपनंही काँग्रेसला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. 

पंतप्रधान मोदी शिक्षक दिना निमित्त आज विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी मोदींच्या महापालिका जिल्हा परिषद शिक्षण विभागाची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे. उसने टीव्ही आणि रेडिओ आणण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आलीय. काही ठिकाणी मुख्याध्यापकांच्या घरचा टीव्ही उचलला जाणार आहे, तर कोणी शाळेच्या बाजूच्या घरातून केबल शाळेत खेचून आणणार आहे. 

नरेंद्र मोदींच्या भाषणाबाबत कोकणामध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे. कोकणात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होता. या काळात शाळा ओस असतात. त्यामुळे मोदींच्या वर्गामध्ये मुलं आणणार कुठून, असा प्रश्न शाळांना पडलाय. त्यातच टीव्ही, केबलची व्यवस्था करण्यातही मुख्याध्यापक-शिक्षकांची धावपळ उडाली आहे. 

ग्रामीण भागातच नव्हे, तर अनेक शहरांमध्येही हीच स्थिती आहे.. एसएमएस आणि तोंडी निरोप पाठवून विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्यात. मात्र सुटीच्या मूडमध्ये असलेले किती विद्यार्थी हजर राहतील याबाबत शंकाच आहे.

टिव्हीची ही उठाठेव आणि कॉम्पुटरची जोरदार साफसफाई सुरु आहे. जालना शहरातल्या शांतीनिकेतन विद्यामंदिरात. शिक्षकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचं आणि विद्यार्थ्यांशी होणाऱ्या संवादाच्या पार्श्वभूमीवर ही साफसफाई करण्यात आली. त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत टीव्ही आणि कॉम्पुटरची सोय करण्यात आलीय. वर्षभर शाळेतील कोपऱ्यात पडून असणाऱ्या कॉम्पुटरलाही मोदींच्या भाषणासाठी दुरुस्त करण्यात येऊन त्यावर बसलेली धूळ साफ केली जात आहे.

 इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.