टोकियो : जपान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील उद्योगपतींशी चर्चा केली आणि भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं.
सोमवारी टोकियोच्या 'निप्पोन काइदानरेन' म्हणजेच जापान चेंबर ऑफ़ कॉमर्स'च्या कार्यक्रमात मोदींनी पुढील मुद्दे मांडले.
1. उद्योगपतींना काम करण्यासाठी चांगल्या वातावरणाची गरज आहे, ही सिस्टमची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे, आम्ही यासाठीच काम करीत आहोत.
2. गुजराथी असल्याने कॉमर्स माझ्या रक्तात आहे, पैसे माझ्या रक्तात आहेत. यासाठी हे समजून घेणं माझ्यासाठी सोप आहे.
3. अर्थव्यवस्थेसाठी मागील एक दर्शक आव्हानात्मक आणि कठीण होतं. मात्र आता पहिल्या तिमाईत 5.7 टक्क्यांचा विकास दर आम्ही गाठली आहे, यामुळे विश्वास निर्माण होतोय.
4. मोठ्या काळानंतर भारतात स्थिर सरकार आलं आहे. यासाठी आम्ही सरकार म्हणून आमच्यावर जबाबदारी देखिल मोठी आहे.
6. आम्ही भारतात जपानी बँकांच्या आणखी शाखा उघडण्यास मंजुरी दिली आहे.
7. पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून एक विशेष टीम बनवली जाईल. ही टीम जपानला भारतात गुंतवणूक करण्यासाठी अधिक सोयीस्कर कसं होईल, यावर काम करेल.
8. जग दोन धोरणात विभागलं आहे, एक विस्तारवादी आणि विकासवादी. विस्तारवादात विकासाला मर्यादा आहेत, पण विकासवादी धोरण अवलंबलं तर अधिक संधी निर्माण होतील, म्हणून आम्ही विकासवादी धोरण स्वीकारलं आहे.
9. सध्या जगभरात अठराव्या शतकाचा विस्तारवाद दिसून येतो, कधी समुद्रात सीमा ओलांडणे, कधी कुणाच्या सीमेत घुसखोरी करणे.
10. एकविसाव्या शतकात शांती आणि प्रगती करण्याची सर्वात मोठी जबाबदारी भारत आणि जापानकडे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.