www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातील खड्ड्यांवरून खासदार सुरेश कलमाडी यांनी राष्ट्रवादीच्या कारभारावर टीका केली होती. पुण्याच्या कारभा-यांनी मात्र कलमाडींच्या या टीकेला थेट उत्तर देण्याचे टाळलंय.
खड्डे काही फक्त पुण्यात नाहीत. असे उत्तर अजित पवार यांनी कलमाडींच्या टीकेवर दिले नाही. तर, खड्डे बुजवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी जातीने लक्ष घालावं असे आदेशही अजित पवारांनी दिले. पुण्यात २००६ साली पडलेल्या खड्यांमुळे कलमाडींना महापालिकेतील सत्ता गमवावी लागली होती. त्याची आठवण करून देत, त्यावेळी पडलेल्या खड्ड्यांपेक्षा आताचे खड्डे जास्त आहेत. अशी टीका कलमाडींनी केली होती.
आता टोल भरा प्रीपेड सिमकार्डाने
टोल नाक्यांवर टोल भरण्यासाठी आता जास्त काळ थांबावं लागणार नाही. कारण, टोल भरण्यासाठी आता प्रीपेड सीम कार्ड उपलब्ध होणार आहे... उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिलीय.
टोल भरण्यासाठी लोक तयार आहेत. मात्र, टोल नाक्यांवर त्यासाठी मोठा वेळ जातो. त्यावर उपाय म्हणून प्रीपेड कार्ड आणण्यात येत आहे. हे प्रीपेड सीम कार्ड वाहनाच्या समोरच्या काचेवर लावलं जाईल. टोल नाक्यावरील कॅमेरे त्याचं स्कॅनिंग करतील.
त्यामुळे वाहन चालकांना विना अडथळा प्रवास करता येणार आहे. येत्या ३ महिन्यात टोल साठीचे प्रीपेड कार्ड सुरु होईल. असं अजित पवार यांनी सांगितले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.