Weekly Tarot Horoscope Prediction 6 to 12 january 2025 in Marathi : जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात धन लक्ष्मी योगाची निर्मिती झालीय. या आठवड्यात मंगळ आणि चंद्राच्या राशी बदलामुळे धन लक्ष्मी योग जाचकाला केवळ आर्थिक लाभच नाही तर करिअरमध्ये यश, प्रगती मान सन्मान वाढवणारा ठरणार आहे. या योगाच्या निर्मितीने सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि वैभव सदैव या लोकांवर असणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून
मेष (Aries Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधींनी भरलेला आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी "एम्प्रेस" कार्ड सूचित करतं की, तुमची सहानुभूती आणि उत्स्फूर्तता इतरांना प्रभावित करणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा आणि मनापासून काम करणे फायद्याचं ठरणार आहे. प्रेमप्रकरणात सुधारणा होणार आहे मात्र विचार करूनच निर्णय घ्या.
वृषभ (Taurus Zodiac)
या राशीच्या लोकांना या आठवड्यात काही अडथळ्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी "हंगर" कार्ड सूचित करतं की, तुम्ही आव्हानांना सामोरे जावं लागेल पण हार मानू नका. तुमची इच्छाशक्ती मजबूत ठेवा आणि पुढे वाटचाल करा. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. पण संयम ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनाला शांती लाभणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
या आठवड्यात "द फूल" कार्ड मिथुनसाठी नवीन अध्याय सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत. नवीन सुरुवात आणि संधींसाठी हा चांगला काळ असणार आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ असणार आहे. प्रेमात नवे वळण येणार आहे पण भावनेच्या प्रभावाखाली कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि तणाव दूर राहा.
कर्क (Cancer Zodiac)
"द रथ" कार्ड या राशीच्या लोकांसाठी ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतोय. या आठवड्यात तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करणार आहात. या आठवड्यात तुम्हाला काही मोठे यश मिळणार आहे. ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेतृत्व कराल. प्रेमाच्या बाबतीत सामंजस्य राखणे महत्वाचे आहे. जुना वाद मिटू शकतो.
सिंह (Leo Zodiac)
या राशीसाठी या आठवड्यात, "द सन" कार्ड आनंद आणि यशाचे प्रतीक आहे. तुमच्या आयुष्यात चमक आणण्याची हीच वेळ आहे. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही तुम्ही समाधानी असाल. नातेसंबंध सुधारतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या आरोग्याची, विशेषतः मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
कन्या (Virgo Zodiac)
या राशीसाठी या आठवड्याचे टॅरो कार्ड "न्याय" आहे. हे कार्ड संतुलन राखण्याचा संदेश तुम्हाला देत आहे. तुम्हाला भविष्यात मोठे बदल घडवून आणणारे निर्णय घ्यावे लागणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल, पण घाई करू नका. प्रेमात शहाणे व्हा आणि एकमेकांच्या मतांचा आदर करा.
तूळ (Libra Zodiac)
या आठवड्यात तुला राशीसाठी टॅरो कार्ड "टेम्परन्स" आहे. हे कार्ड तुम्हाला संयम आणि संतुलन राखण्याचा सल्ला देते. मानसिक शांती मिळवण्याची हीच वेळ आहे. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका, विशेषत: पैशांच्या बाबतीत. नातेसंबंधात प्रेम आणि समजूतदारपणा कायम ठेवा. नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पूर्ण तयारी करा.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
वृश्चिक राशीसाठी या आठवड्यातील टॅरो कार्ड हे "डेड" कार्ड आहेत जे जुने नाते किंवा कल्पना सोडून देण्यास तुम्हाला सल्ला देत आहे. बदलाची हीच वेळ आहे. जुन्या सवयी सोडण्याची गरज आहे. नोकरीमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात, मात्र आधी जुने काम पूर्ण करा. प्रेमात सखोल संबंध निर्माण होतील, मात्र त्यासंबंधी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या.
धनु (Sagittarius Zodiac)
या राशीसाठी या आठवड्यातील टॅरो कार्ड "द हंग मॅन" कार्ड आहेत. टॅरो कार्डनुसार, धनु राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणतेही बदल करण्यापूर्वी थांबून विचार करावा. कधी कधी थांबून विचार केल्यास धनलाभ होतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्थितीचा पुनर्विचार करावा लागेल. नातेसंबंधात शहाणे आणि संयम बाळगा. आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ आहे.
मकर (Capricorn Zodiac)
मकर राशीसाठी या आठवड्याचे टॅरो कार्ड "द स्टार" आहे. हे कार्ड या आठवड्यात तुमच्यासाठी आशा आणि नवीन दिशा घेऊन आला आहे. हा आठवडा प्रेरणादायी आणि नवीन सुरुवात करणारा आहे. तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. प्रेमाच्या बाबतीतही हा काळ चांगला आहे. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढे जा. तसेच तुमच्या आरोग्याची काळजी घ्या कारण वाढत्या थंडीमुळे तुम्हाला खोकला आणि सर्दीचा त्रास होण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
या राशीसाठी या आठवड्याचे टॅरो कार्ड "द एच" आहे. या आठवड्यात हे कार्ड तुम्हाला तुमच्या निर्णयांमध्ये स्वावलंबी होण्याचा सल्ला देते. ही वैयक्तिक वाढ आणि आत्मविश्वास वाढवण्याची वेळ आहे. नोकरीत काही मोठे बदल होणार आहेत. प्रेमाच्या बाबतीत तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा. हा आठवडा तुमची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी असणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
या राशीसाठी या आठवड्याचे टॅरो कार्ड "द मून" आहेत. अशा परिस्थितीत या आठवड्यात तुमच्या अवतीभवती काही गोंधळ होण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. तुमच्या कामात स्पष्ट राहा. कोणताही गोंधळ टाळण्यासाठी तुमचा आतला आवाज ऐका. तुम्ही प्रेमात काही गोंधळात अडकू शकता, मात्र योग्य दिशेने जाण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)