क्रिकेट

रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे कोच, मिळणार सर्वांत जास्त मानधन?

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री भारतीय संघाचे नवे कोच म्हणून सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून हा दावा केलाय. रवी शास्त्रींकडे टीम इंडियाच्या कोच पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे सध्याचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपला आहे.

Jun 11, 2015, 02:14 PM IST

फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत एमएस धोनी

जगभरातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंच्या यादीत भारताच्या फक्त महेंद्रसिंह धोनीचे नाव आहे. फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंची नावे जाहीर केली, या यादीत महेंद्र सिंह धोनीच्या नावाचा समावेश आहे.

Jun 11, 2015, 01:20 PM IST

Live स्कोअरकार्ड : भारत - बांग्लादेश पहिली कसोटी

भारत आणि बांग्लादेशमध्ये पहिली कसोटी सुरु आहे.

Jun 10, 2015, 10:13 AM IST

MCA निवडणूक रंगतदार: काँग्रेस-शिवसेना तर राष्ट्रवादी-भाजप एकत्र

मुंबई क्रिकेट असोसिएशनची यंदाची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेनं विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलला पाठिंबा दिलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र मिळून ही निवडणूक लढवतायत.

Jun 9, 2015, 08:32 PM IST

बांग्लादेश दौरा : कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया ढाक्यात दाखल

बांग्लादेश विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया बांग्लादेशमध्ये दाखल झाली आहे.

Jun 8, 2015, 02:03 PM IST

राहुल द्रविडची भारताच्या 'अ' आणि अंडर १९ टीम कोचपदी निवड

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडची भारताच्या 'अ' आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  बीसीसीआय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या  शनिवारी झालेल्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परंतु बांग्लादेश दौऱ्यानंतर वरिष्ठ संघाच्या संचालक पदावरील रवि शास्त्री यांच्या भविष्यावर असमाधानी स्थिती सुरू आहे.

Jun 7, 2015, 12:49 PM IST

भारतीय अंध क्रिकेट टीमचा भीमपराक्रम, इंग्लंडला व्हाईटवॉश

इंग्लंड देशात भीमपराक्रम गाजवणारी भारतीय अंध क्रिकेट टीम मायदेशी परतलीय. वनडे, टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम भारतीय अंध क्रिकेट टीमनं केलाय.

Jun 5, 2015, 02:40 PM IST

टीम इंडियाच्या अंतरिम कोच, प्रशिक्षकपदी प्रथमच भारतीय

माजी खेळाडू रवी शास्त्री यांची बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय बांगर बॅटिंग कोच आणि बी. अरुण हे बॉलिंग कोच असणार आहेत.

Jun 2, 2015, 01:02 PM IST

गेलची विस्फोटक खेळी, ३ चेंडू हरविले नदीमध्ये

 २२८ षटकारसह आयपीएलमध्ये सिक्सर किंग ठरलेला क्रिस गेल आता इंग्लडमध्ये आपल्या विस्फोटक फलंदाजीचा नमुना दाखविला. इंग्लडमध्ये पहिल्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले. 

Jun 1, 2015, 06:39 PM IST

आता भारत-पाक सिरीजसंदर्भात निर्णय नाही- सुषमा स्वराज

भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सिरीज संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना सांगितले. 

May 31, 2015, 07:44 PM IST

डोपिंग चाचणी : पाकिस्तानच्या दोषी हसन रझावर बंदी

 डोपिंग चाचणीत दोषी आढल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाज हसन रझा याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या क्रिकेटपटूंच्या नमुन्यात तो दोषी आढळला. 

May 27, 2015, 09:47 AM IST

तर विराटची कारकीर्द वाया जाऊ शकते - अझरूद्दीन

विराट कोहलीने त्याच्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण न मिळवल्यास त्याची संपूर्ण कारकीर्द वाया जाऊ शकते, असा सल्ला टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीनने दिला आहे. 

May 25, 2015, 07:31 PM IST

अकरम म्हणतोय, अर्जुन तेंडुलकर ध्येयवेडा मुलगा

कोलकाता नाईट रायडर्सचे कोच आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अकरम यांनी नुकतीच मुंबईत मास्टर ब्लास्टरच्या सचिन तेंडुलकरच्या छोट्या मास्टरची म्हणजेच अर्जुन तेंडुलकरची भेट घेतली.

May 21, 2015, 01:44 PM IST