क्रिकेट

युवराज सिंगच्या नावाची निवड समितीत चर्चा नाही : संदीप पाटील

बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मात्र, या टीममध्ये युवराज सिंग याला स्थान देण्यात आलेले नाही. परंतु ऑफ स्पिनर हरभज सिंग याने कमबॅक केले. टीमची घोषणा करताना युवीच्या नावाची चर्चाही झालेली नाही, अशी स्पष्ट कबुली निवड समितीचे मुख्य संदीप पाटील यांनी दिली.

May 20, 2015, 07:58 PM IST

भारताच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा जस्टिन लॅंगर

ऑस्ट्रेलियाचा माजी फंलदाज जस्टिन लॅंगरचा देखील भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत समावेश झाला आहे. वर्ल्ड कपनंतर डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर हे प्रशिक्षक पद रिक्त झालं होतं. 

May 18, 2015, 02:02 PM IST

क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर : भारत-पाक क्रिकेट सीरिजला परवानगी!

भारत - पाक क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सीरिजला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळालीय. 

May 14, 2015, 12:08 PM IST

आयपीएल बेटिंग प्रकरणी देशभरातील बुकींवर EDचे छापे

IPLच्या देशभरातील बुकींवर EDनं छापे मारल्याची बातमी येतेय. काल दिल्ली, बंगळुरू, जयपूर आणि देशातील अन्य भागांतील सक्रीय बुकींवर EDनं छापे मारलेत. 

May 11, 2015, 01:13 PM IST

वर्षअखेर पुन्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने

भारत-पाकिस्तान क्रिकेट वॉर अनुभवण्याची संधी पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना मिळणार आहे, या वर्षाच्या डिसेंबरमध्ये भारत-पाकमध्ये ३ कसोटी, ५ वन डे आणि २ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

May 10, 2015, 11:44 PM IST

५९ चेंडूत १९ फोर , ४ सिक्स, १३३ रन्स

बंगळूरच्या एबी डिव्हिलर्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना त्यांच्याच घरच्या मैदानावर ५९ चेंडूंत १३३ धावा ठोकल्या. एबी डिव्हिलर्सला कर्णधार विराट कोहलीने चांगली साथ दिल्याने बंगळूरने मुंबईसमोर विजयासाठी २३६ धावांचे जवळपास अशक्‍य आव्हान उभे केले. 

May 10, 2015, 10:45 PM IST

मॅच सुरू असतानाच दहशतवाद्यांचा हल्ला, दोन खेळाडू ठार

दक्षिण पूर्व अफगाणिस्तानात एका क्रिकेट मॅचवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं समजतंय. या हल्ल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झालाय तर इतर सहा जण गंभीर जखमी झालेत. 

May 8, 2015, 09:43 PM IST

विराटच्या हातात जगातील सर्वात तेजतर्रार कार... AUDI R 8 LMX

भारतीय क्रिकेट टीमचा उपकर्णधार विराट कोहली आता थोडा आणखी स्पेशल बनलाय... कारण, आता विराट कोहली अशांपैकी एक आहे ज्या व्यक्तींकडे ऑडीची आत्तापर्यंतची सर्वात वेगवान सुपरकार आहे.

May 8, 2015, 08:44 PM IST

व्हिडिओ - क्रिकेटच्या मैदानावर १० हास्यास्पद किस्से

क्रिकेटच्या मैदानावर नेहमी असे किस्से घडतात, जे खेळाडू जाणून-बुजून करत नाही. पण अचानक झालेल्या घटनांमुळे एकतर खेळाडूंना शरमेने मान खाली घालावी लागते, तर कधी खेळाडू हे क्षण एन्जॉय करतात. 

May 7, 2015, 05:22 PM IST

बांग्लादेश दौरा : भारतीय टीममध्ये नविन चेहऱ्यांना संधी

टीम इंडियाचा पुढील महिन्यात बांग्लादेश दौरा असणार आहे. ७ जूनला भारतीय टीम बांग्लादेशला रवाना होणार आहे. मात्र, या दौऱ्यात नविन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

May 6, 2015, 01:07 PM IST

टीम इंडियाच्या कोचची जबाबदारी मिळाली, तर सांभाळणार : द्रविड

टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ मे महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन कोच कोण होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. नवीन कोचचा शोध देखील सुरु आहे.

May 6, 2015, 12:26 PM IST

इंग्लंडचा जोनाथन ट्रॉट कसोटीतून निवृत्त

इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जोनाथन ट्रॉट याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांमधील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने हा निर्णय जाहीर केला. 

May 5, 2015, 10:02 AM IST