शेतकरी

"समुपदेशनाची गरज शेतक-यांना नाही, मंत्र्यांना आहे"

भाजप-शिवसेना सरकारमधील मधील मंत्री आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे सांगत आहेत. मात्र आज समुपदेशाची खरी गरज शेतकऱ्यांपेक्षा वादग्रस्त विधाने करुन, शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्यानाच जास्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

May 14, 2015, 07:12 PM IST

दूधासाठी शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला, पण ग्राहक मोजतायत चढे भाव

दूधासाठी शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला, पण ग्राहक मोजतायत चढे भाव

May 12, 2015, 12:29 PM IST

अकरा दिवसांत सहावा दरोडा, येवल्यात शेकऱ्याला लुटले

 येवल्यात दरोडेखोरांचा धुमाकुळ सुरुच आहे. अंगुलगावात दरोडेखोरांनी गेल्या अकरा दिवसांत सहावा दरोडा टाकलाय. अंगुलगाव येथे दत्ता जाधव या शेतकऱ्यांच्या सुमारे १० दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकीत ५९ हजार रुपये लुटले. आजच्या घटनेने अंगुलगावकरांसह तालुका हादरला आहे.

May 5, 2015, 11:40 AM IST

"हे सरकार शेतकरीविरोधी", राहुल गांधीची घणाघाती टीका

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत, ते शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतांना भाजपला टार्गेट करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीयत. राहुल गांधी म्हणाले, " विदर्भात मी यापूर्वीही आलो होतो, परंतु अशी परिस्थिती यापूर्वी मी कधीही पाहिली नाही. येथील शेतकऱ्यांची स्थिती चिंताजनक आहे, भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे".

Apr 30, 2015, 07:25 PM IST

राहुल गांधी यांचा विदर्भ दौरा, शेतकऱ्यांशी चर्चा

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुंजी, शहापूर येथील भागाचा दौरा केला. मात्र, शेतकऱ्यांनी ठोस आश्वासन मिळालेले नाही.

Apr 30, 2015, 12:09 PM IST

हरियाणाच्या कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य

हरियाणातील भाजप सरकारमधील कृषिमंत्री ओमप्रकाश धनखड यांनी आत्महत्या करणारा शेतकरी भित्रा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Apr 29, 2015, 05:06 PM IST

शेतकऱ्यांचे दु:ख, समस्या सोडवा, पैशाने सुटत नाही : राहुल गांधी

शेतकऱ्यांना पैसे देऊन प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यांचे दुःख, समस्या ऐकून घेण्याची गरज आहे. मात्र यात केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

Apr 29, 2015, 11:50 AM IST