शेतकरी

मुख्यमंत्री फडणवीस यांचा परभणीत हुर्यो

आत्महत्याग्रस्त शेतकरीच्या कुटुंबीयांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार होते. तसे नियोजित दौऱ्यात होते. मात्र, गावात जाऊनही त्यांनी भेट घेण्याचे टाळले. त्यामुळे नाराज ग्रामस्थांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Mar 5, 2015, 06:05 PM IST

निसर्गराजाशी लढण्यासाठी "जय किसान, जय तंत्रज्ञान"

 दोन आठवड्यांपूर्वी एका कृषी विषयक कार्यक्रमासाठी औरंगाबादला गेलो होतो. येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक बागायतदारांनी शेतात कृत्रिम तळी तयार करून पाणी साठवले. पण उन्हाळ्याची चाहूल लागताच शेततळ्यांतील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊ लागले आणि साठवलेले पाणी पावसाळ्यापर्यंत कसे पुरवायचे चिंतेत या शेतकरी गढला. गेले चार दिवस निसर्गराजा अवकाळी संपूर्ण महाराष्ट्रभर बरसला आणि अनेक ठिकाणी रब्बी हंगामाचे पीक धुवून गेला. या तडाख्यातून बाहेर यावे तर दोन-चार दिवसांनी गारांच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे आणि वर सावधगिरीचा इशाराही दिला आहे. सावध व्हायचे तर नक्की काय करायचे? ज्यांचे पीक वाचले आणि कापणीला आले आहे... त्यांच्या हातात काहीतरी करणे शक्य आहे. बाकीच्या शेतकऱ्यांच्या हाती... आपल्या शेतावर गारपीट होऊ नये अशी प्रार्थना करण्यापलिकडे काही उपाय नाही.

Mar 5, 2015, 01:06 PM IST

शेतकऱ्यांचा 'मार्चएण्ड', मुख्यमंत्र्याचं 'पिंपरी लाईव्ह'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात दौरा करून प्रगतीशील शेतकऱ्यांची भेट घेतली आणि गावकऱ्यांशी संवाद साधत रात्री पिंपरी या गावातच शेतकऱ्याकडे मुक्काम ठोकला.

Mar 4, 2015, 12:58 PM IST

'महिनाअखेर पर्यंत शेतकऱ्यांना मदत'-मुख्यमंत्री

राज्यात १७ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱयांना मदत देण्यात येईल.

Mar 2, 2015, 01:52 PM IST

भूसंपादनाचा कायदा केंद्राचा, मात्र नियम राज्याचे - गडकरी

भूसंपादनाचा कायदा केंद्राचा, मात्र नियम राज्याचे - गडकरी

Feb 27, 2015, 06:52 PM IST

भूसंपादनाचा कायदा केंद्राचा, मात्र नियम राज्याचे - गडकरी

देशभरात भूसंपादन कायद्याला होणारा विरोध पाहून मोदी मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: समोर येऊन या कायद्याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. 

Feb 27, 2015, 04:00 PM IST

'आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना अद्याप मदत का नाही?'

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतलीय.

Feb 18, 2015, 11:50 AM IST