सर्वोच्च न्यायालय

निवडणुकीत निगेटीव्ह व्होटिंग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

निवडणुकीत निगेटीव्ह व्होटिंगवर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलाय. त्यामुळे आता मतदारांना उमेदवार नाकारण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यासाठी EVM मशिनमध्ये `रिजेक्ट`चं बटण द्यावे, असं सर्वोच्च न्यायालयने हा निर्णय देताना म्हटलं आहे.

Sep 27, 2013, 11:52 AM IST

`एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे पत्नीशी क्रूरता नाही`

‘एखादा पती आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर महिलेबरोबर संबंध जवळीक वाढवित असेल तर त्या व्यक्तीवर बायकोशी क्रूरपणे वागल्याचा आरोप सिद्ध होत नाही’ असं एका प्रकरणाचा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

Sep 10, 2013, 03:17 PM IST

केंद्राचे गुन्हेगारीला अभय, तुरूंगातील नेता पात्रच

केंद्रातील सरकारने न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत गुन्हेगारी नेत्याला अभय दिले आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नेता तुरूंगात असेल तर तो अपात्र होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तुरुंगातील व्यक्तींचा हा हक्क अबाधित राखणारा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करण्यात आलाय.

Aug 28, 2013, 04:49 PM IST

बलात्काराच्या घटनांत `तडजोड` अवैध : सुप्रीम कोर्ट

बलात्काराच्या घटनांमध्ये तडजोड होऊ शकत नाही आणि या आरोपींना पीडितेनं क्षमा केलं तरीही कायद्यानं त्यांना क्षमा मिळू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.

Aug 27, 2013, 04:46 PM IST

चारा घोटाळा : लालूप्रसाद यादवांना SCचा दणका

बिहारमधील चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सीबीआय कोर्टाचे न्यायाधिश बदलण्याची त्यांची विनंती कोर्टानं अमान्य केलीये.

Aug 13, 2013, 01:37 PM IST

किश्तवाड हिंसाचार : आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या -SC

किश्तवाड हिंसाचार प्रकरणी आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवांना दिलेत. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी काय पावलं उचलली याची विचारणा कोर्टानं केलीये. जे ऍण्ड के पॅन्थर्स पार्टीचे प्रमुख भीम सिंग यांनी केलेल्या याचिकेवर कोर्टानं हे आदेश दिलेत.

Aug 13, 2013, 01:09 PM IST

अॅसिड हल्ल्याचा गुन्हा ठरणार अजामीन पात्र !

अॅसिड हल्लाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिलाय. अॅसिड हल्ला अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. आरोपीवर आता कठोर कारवाई होणार आहे. पीडित व्यक्तीला ३ लाखांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.

Jul 18, 2013, 08:14 PM IST

डान्सबारचा इतिहास

सुप्रीम कोर्टाने डान्सबार बंदीचा निर्णय रद्दबादल ठरवल्यामुळे पुन्हा एकदा डान्सबारवर चर्चा सुरु झाली. काही वर्षांपूर्वी डान्सबारमुळे राज्यात एक नवी संस्कृतीच उदयास आली होती.

Jul 16, 2013, 06:55 PM IST

मुंबईत पुन्हा छमछम सुरूच राहणार

राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील डान्सबारवर २००६मध्ये बंदी घातली होती. आता ही बंदी उठविण्यात यावी आणि डान्स बार सुरू करण्यात यावेत, अशा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने पुन्हा डान्सबार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबईत छमछम सुरूच राहणार आहे.

Jul 16, 2013, 11:44 AM IST

कधी ठेवावेत संबंध, १८, १६ की १५ व्या वर्षी?

पुन्हा एकदा सहमतीने संबंध ठेवण्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण न्यायालयाने सहमतीने संबंध ठेवण्याबाबत केंद्र सरकार नोटीस बजावली आहे. केंद्राने आधी १६ वर्षे निश्चित करण्याचे म्हटले होते. परंतु प्रखर विरोध झाल्यानंत निर्णय मागे घेतला. आता १८ वर्षेच वय असावे, अशी एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

Jul 11, 2013, 12:13 PM IST

`दोषी आमदार, खासदारांना निवडणूक बंदी`

जेलची सजा भोगून बाहेर आलेल्या आणि जेलमध्ये असणाऱ्यांना आता निवडणूक लढविता येणार नाही. असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आमदार, खासदार यांनी दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगली असेल तर त्यांनाही निवडणूक लढविता येणार नाही.

Jul 10, 2013, 03:59 PM IST

संजय दत्तची मागणी, टाडा कोर्टाचे सीबीआयला निर्देश

अभिनेता संजय दत्तनं येरवडा जेलमध्ये शरण येण्याची परवानगी मिळावी यासाठी टाडा कोर्टात याचिका दाखल केलीय. संजय दत्तची मागणी मान्य करणे शक्य आहे का, याबाबत टाडा कोर्टाने सीबीआयला निर्देश दिले आहेत. तसंच उद्यापर्यंतच म्हणणं मांडण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.

May 14, 2013, 07:54 PM IST

भारतात पॉर्न वेबसाइट्सवर बंदी का नाही?

इंटरनेटवर दिसणाऱ्या सर्व पॉर्न वेबसाइट्सवर भारतामध्ये बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तसंच इंटरनेटवर पॉर्न कंटेट पाहिल्यास आता कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Apr 16, 2013, 05:15 PM IST

भुल्लरची दया याचिका फेटाळली, फाशी कायम

१९९३ मधल्या दिल्ली स्फोटातला आरोपी देविंदर पाल सिंग भूल्लर याची फाशी सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवलीय. फाशीची शिक्षा रद्द करावी याबाबत भूल्लरनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली.

Apr 12, 2013, 01:05 PM IST

सर्वोच्च न्यायालयाची ८ जणांच्या फाशीवर स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविण्यात आलेल्या आठ गुन्हेगारांच्या फाशीला चार आठवड्यांची स्थगिती दिली. संसद हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरूला फाशी देण्यात आल्यानंतर त्याचे दफन जेलच्या आवरात केले. मात्र गुरूच्या नातेवाईकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या बाबतीत जी चूक घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये. याची खबरदारी घेत न्यायालयाने स्थगिती दिली

Apr 7, 2013, 04:48 PM IST