सर्वोच्च न्यायालय

गंगा सफाई : केंद्रातील मोदी सरकारला न्यायालयानं फटकारलं

गंगा सफाईच्या धीम्या गतीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने  केंद्र सरकारला फटकारलयं. सध्याची योजनेनुसार 200 वर्षांपर्यंत गंगेची सफाई होणार नाही असं सांगत 3 आठवडयात नवी योजना सादर करण्याचे आदेश दिलेत.

Sep 3, 2014, 04:18 PM IST

सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीशपदी एल दत्तू

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी एल दत्तू यांच्या नावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीय. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असलेल्या एच एल दत्तू यांची भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून २७ सप्टेंबरला नियुक्ती करण्यात येणार आहे. 

Sep 3, 2014, 03:56 PM IST

लोकसभेतील 'विरोधी पक्षनेता' पदाकडे कानाडोळा नको - सर्वोच्च न्यायलय

लोकसभेतील ‘विरोधी पक्षनेते’पद आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचलंय. सुप्रीम कोर्टानं अॅटर्नी जनरलकडे याबद्दल स्पष्टीकरण मागितलंय.

Aug 22, 2014, 01:18 PM IST

येळ्ळूरमधील घटना गंभीर - सर्वोच्च न्यायालय

येळ्ळूरमधील मराठी भाषिकांवरील कर्नाटक पोलिसांनी केलेला लाठीमार ही गंभीर घटना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे पोलिसांना चांगलीच चपराक  बसलेय.

Aug 1, 2014, 01:04 PM IST

काळवीट शिकार : सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे. काळवीट शिकार प्रकरणी सुप्रीम कोर्टानं ही नोटीस बजावलीय.

Jul 9, 2014, 12:28 PM IST

हुंडा प्रकरणांत अटकेची घाई नको - सुप्रीम कोर्ट

हुंडाविरोधी कायद्याचा दुरुपयोग केला जातोय, असं आता सुप्रीम कोर्टानंही मान्य केलंय... आणि त्यामुळेच, अशा प्रकरणांत सासरच्या मंडळींना अटक करण्यात पोलिसांनी घाई करू नये, असंही न्यायालयानं बजावलंय. 

Jul 3, 2014, 03:31 PM IST

सर्वोच्च न्यायालय सरन्याधीशांचे मोदी सरकारवर ताशेरे

 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश आर.एम. लोढा यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढलेत. न्यायमूर्ती गोपाल सुब्रह्मण्यम यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्याधीशपदी शिफारस करणारी फाईल कोणतीही पूर्वसूचना न देता परत पाठवण्यात आली.

Jul 2, 2014, 01:15 PM IST

मुदगल समितीलाच `आयपीएल`ची चौकशी करण्याचे आदेश

आयपीएलमध्ये घडलेलं स्पॉट फिक्‍सिंग आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुदगल समितीच काम करेल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुदगल समिती सदस्यांची संख्या वाढविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

May 18, 2014, 12:36 PM IST

खुशखबर… ‘बेस्ट’च्या विजेला ‘टाटा’चा पर्याय!

बेस्टच्या चढ्या दराच्या विजेला कंटाळलेल्या मुंबईकरांना स्वस्त वीज मिळू शकण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबईना आता `टाटा` की `बेस्ट` हा ऑप्शन उपलब्ध झालाय.

May 9, 2014, 10:49 AM IST

राज्यातून डान्सबार होणार हद्दपार, मंत्रिमंडळ लागले कामाला

डान्सबार बंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अवमानप्रकरणी नोटीस पाठवली असतानाच आता डान्सबारवर कायमस्वरुपी बंदी घालण्यासाठी नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

May 8, 2014, 07:39 PM IST

पॉर्न वेबसाईटवर बंदी जास्त धोकादायक - केंद्र सरकार

पॉर्न बेवसाईटवर बंदी घातली तर अधिक नुकसान होईल, असं मत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केलंय.

May 6, 2014, 08:15 AM IST

सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवाशांची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवाशांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे रहिवाशांना 31 मे पर्यंत राहण्याचा दिलासा मिळाला आहे. याचिका फेटाळण्यात आल्याने मुंबई महापालिकेचा कारवाईचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

May 5, 2014, 01:18 PM IST

राजीव गांधी मारेकऱ्यांच्या सुटकेला स्थगिती कायम

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेक-यांच्या सुटकेचं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून संविधान पिठाकडे वर्ग करण्यात आले आहे. संविधान पिठाच्या निर्णयापर्यंत मारेकरी तुरुंगातच राहणार आहेत.

Apr 25, 2014, 11:39 AM IST

महिलांना सलग ७३० दिवस विनाखंड सुट्टीचा हक्क!

कोणतीही केंद्रीय सरकारी नोकरदार महिला आपल्या सेवाकाळात आपल्या मुलांच्या संगोपणासाठी, मग ते परिक्षेसाठी असो किंवा आजारपणासाठी... सलग दोन वर्षांची सुट्टी घेऊ शकते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.

Apr 16, 2014, 12:10 PM IST

`सहारा`चे सुब्रतो रॉय यांना पोलीस कोठडी

सहारा उद्योगसमूहाचे मालक सुब्रतो रॉय यांनी आज शुक्रवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यांनी ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

Feb 28, 2014, 11:09 AM IST