arrest

अमेरिकेत ऑनलाईन चाईल्ड पॉर्न, आंतरराष्ट्रीय टोळी अटकेत

अमेरिकन अधिकाऱ्यांनी ऑनलाईन चाईल्ड पॉर्न सेवा देणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. अधिकाऱ्यांनी गुप्त स्वरूपात वेबसाईट चालविणाऱ्या १४ जणांच्या टोळीला अटक केली आहे.

Mar 20, 2014, 12:24 PM IST

`डॉन` अश्वीन नाईकला अटक

वसंत पाटकर या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून कुख्यात गुंड अश्वीन नाईकला बुधवारी रात्री अटक करण्यात आलीय.

Mar 20, 2014, 12:09 PM IST

अॅसिड हल्ला : पुण्याच्या 'त्या' तरुणाला अटक

सध्या तुरुंगात असलेला कथित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू आणि त्याचा पुत्र नारायण साई यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या व्यक्तींना काही अज्ञातांकडून लक्ष्य केलं जातंय.

Mar 18, 2014, 04:14 PM IST

चोऱ्यांचं शतक ठोकून `तो` झाला आऊट!

पुण्यात एका चोराने चक्क चोऱ्यांचं शतक केलंय. त्याचे शंभर गुन्हे करुन झाल्यावर १०१ वी चोरी करताना पोलिसांनी त्याला अटक केलीय.

Feb 20, 2014, 08:25 PM IST

मनसे आंदोलन : राज यांच्यानंतर आणखी कोण अटकेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज राज्यभरात होणा-या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धडरपकड सुरु केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Feb 12, 2014, 12:21 PM IST

सावकारी प्रतिबंधक कायद्याचं राज्यात `वसंत` उद्घाटन...

नांदेड जिल्ह्याच्या लोहा-कंधार लालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना व्याजावर पैसे देऊन त्यांची शेकडो एकर शेती हडप करणाऱ्या एका सावकाराला आणि त्याच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

Jan 22, 2014, 01:22 PM IST

मंदिरात भिंतीत पुरलेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलं...

दहिसरच्या आनंदनगर परिसरातील विट्ठल मंदिरात झालेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत उलगडा केलाय.

Jan 5, 2014, 10:35 AM IST

पिंपरीत ‘स्पेशल ४२’ची कामगिरी, ५ सोनसाखळी चोरांना अटक

पिंपरीत सोनसाखळी चोरांचा धुडगूस सुरू असल्यानं स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या ‘स्पेशल ४२’ या तपास पथकानं पाच सोनसाखळी चोरांना अटक केलीय. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे ४२ गुन्हे उघडकीस आले असून, ६० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

Jan 1, 2014, 09:45 PM IST

मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी, तिघांना अटक

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातून राज्यात अंमली पदार्थांची तस्करी सुरू झालीय. मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मुंबईत येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना आहे.

Dec 31, 2013, 11:54 AM IST

विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाबद्दल प्राचार्यासह शिक्षिकेला अटक

वलसाड जिल्ह्यातील सिल्धवा गावातील आश्रमशाळेत शिक्षिकेच्या मदतीनं एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. या प्रकरणात आश्रमशाळेच्या प्राचार्यासह एका शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांना कोर्टानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Dec 30, 2013, 05:49 PM IST

अरमान कोहलीला जामीन मंजूर... गेला बिग बॉसच्या घरात...

बिग बॉसच्या घरातून डायरेक्ट तुरुंगात गेलल्या बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याला जामीन मंजूर करण्यात आलाय. सोमवारी रात्री उशीरा अरमानला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती.

Dec 17, 2013, 02:00 PM IST

‘बिग बॉस’मध्ये अटक, अरमान कोहली घरातून थेट तुरुंगात

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलाच वादात सापडलाय. आरोप-प्रत्यारोपानंतर आता बिग बॉसच्या घरात अटक झालीय. अभिनेता अरमान कोहली याला लोणावळा पोलिसांनी अटक केलीय. बिग बॉसच्याच घरात असलेली सदस्य सोफिया हयातनं तिला अरमाननं मारहाण केल्याची तक्रार केली होती.

Dec 16, 2013, 11:35 PM IST

संध्या सिंह हत्याप्रकरणी मुलगा रघुवीर सिंहला अटक

नवी मुंबईतल्या संध्या सिंह हत्याप्रकरणी पहिली अटक झालीय. संध्याचा मुलगा रघुवीर सिंग पोलिसांना शरण येताच त्याला अटक करण्यात आलीय.

Dec 16, 2013, 10:05 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना पत्नीसह अटक

इन्कम टॅक्सच्या बनावट दाखल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यानंतर कोर्टानं त्यांची २० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केलीय.

Dec 13, 2013, 09:20 PM IST

योगाचे धडे देता-देता... परदेशी महिलेवर बलात्कार!

परदेशातून योगाचे धडे घेण्यासाठी भारतात दाखल झालेल्या एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदविण्यात आलीय.

Dec 10, 2013, 05:33 PM IST