फरार नारायण साईला अखेर पंजाबमधून अटक...
गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आसारामपुत्राला अखेर अटक करण्यात आलीय. सुरतमधील बलात्कारप्रकरणी नारायण साईला पंजाबमधून अटक करण्यात आलीय.
Dec 4, 2013, 09:25 AM ISTदरोडा आणि हत्येप्रकरणी ६ जणांना अटक
पाथर्डी गावातील मोंढे वस्तीवर १ नोव्हेंबर रोजी पडलेल्या दरोड्या प्रकरणी ६ जणांना १६ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
Nov 11, 2013, 10:01 AM ISTमहिलांना संमोहित करुन लुटणाऱ्या भोंदूबाबाला अटक
मुंबईतल्या वडाळा परिसरात एका भोंदू साधूचा पर्दाफाश करण्यात आलाय. महिलांना संमोहित करुन त्यांच्या गळ्यातल्या दागिने घेऊन हा साधू फरार होत असे... राजू चौगुले असं या भोंदू साधूचं नाव आहे...
Nov 7, 2013, 09:01 AM ISTदीड वर्षांनंतर उलगडलं योगेश्वरी मंदीरातील चोरीचं रहस्य
तब्बल दीड वर्षापूर्वी घडलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिरातील दरोडा प्रकरणाचा उलगडा झाला असून पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केलीय.
Oct 21, 2013, 09:53 PM IST१६ चीनी नागरिकांना घुसखोरी करताना अटक
भारत-चीन सीमा अनधिकृतरित्या ओलांडून भारतात घुसखोरी करण्याऱ्या १६ चीनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बहुसंख्य तिबेटमधील नागरिक आहेत.
Oct 17, 2013, 06:48 PM ISTआंतरजातीय विवाहाचा राग, सासरच्यांनी केलं सूनेचं मुंडण
घरच्यांचा विरोध असतानाही मुलानं आंतरजातीय विवाह केल्याच्या राग त्याच्या नातेवाईकांनी नववधूवर काढून तिचं मुंडण केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीमध्ये घडलाय. या प्रकरणी भिवंडीतल्या पडघा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीय. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. दरम्यान, आता या प्रकरणी महिलेच्या सासरच्या तिघांना अटक करण्यात आलीय.
Oct 14, 2013, 09:14 PM ISTविमानाच्या शौचालयात सापडलं ३२ किलो सोनं!
एअर इंडियाच्या एका विमानाच्या शौचालयात तब्बल ३२ किलोचं सोनं सापडलंय. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत जवळजवळ १५ करोड रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.
Oct 8, 2013, 10:22 AM ISTमुस्लिम तरुणांना विनापुरावा ताब्यात घेऊ नका- शिंदे
अल्पसंख्यक समाजाच्या लोकांना विनाकारण ताब्यात घेतलं जाऊ नये, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेत. त्यांनी यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय.
Sep 30, 2013, 04:37 PM ISTपुन्हा... चालत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
‘दिल्ली गँगरेप’ घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही काही दिवसांतच पुन्हा या क्रूर घटनेची पुनरावृत्ती झालीय. झारखंडच्या खूंटी-रांची रोडवर एका बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचं उघड झालंय.
Sep 24, 2013, 11:51 AM ISTअपहरण आणि हत्येच्या फरार आरोपीला अटक
पुण्यातल्या रुपाली चव्हाण अपहरण आणि हत्या प्रकरणातला आरोपी हनुमंत ननवरे तब्बल चार वर्षांनी पोलिसांच्या तावडीत सापडलाय.
Sep 17, 2013, 09:17 PM ISTATM मध्ये ग्राहकांना गंडवणाऱ्यांना अटक
नालासोपारा शहरात सिंडीकेट बँकेच्या एटीएमध्ये ग्राहकांना गंडवणा-या तीघा आरोपींना पकडण्यात आलय.त्यांचे कारनामे सीसीटीव्हीत कैद झालेत.
Sep 15, 2013, 08:27 PM IST`बोगस` आयपीएस पोलीस अधिकाऱ्याला बेड्या!
आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत अनेकांना फसवणाऱ्या बोगस अधिकाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केलीय. पोलिसी पेहरावात अनेक कार्यक्रमात तो मिरवायचा. अखेर त्याचं बिंग फुटलं आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
Sep 7, 2013, 07:35 PM IST`इंडियन मुजाहिद्दीन`चा म्होरक्या यासिन भटकळ अटकेत!
कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ याला नेपाळमध्ये अटक करण्यात आलीय. एनआयएच्या टीमनं नेपाळमधून त्याला अटक केलीय.
Aug 29, 2013, 10:51 AM ISTभक्तांना त्रास देणाऱ्यांना 'फिल्मी स्टाईल' अटक!
देवाकडे साकडं घालण्यासाठी अनेक भक्त प्रत्येक सोमवारी मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असतात. याच भक्तांना परतीच्या प्रवासात मात्र काही तरुणांच्या हुल्लडबाजीला आणि त्रासाला सामोरं जावं लागत होतं.
Aug 28, 2013, 11:45 AM ISTसेक्स रॅकेट : बारमध्ये आमदाराला सहा कॉलगर्लसह अटक
उत्तर प्रदेशमधला समाजवादी पक्षाचा आमदार महेंद्र कुमार सिंहला गोव्यात सहा कॉलगर्लसह अटक करण्यात आलीय. गोवा पोलिसांनी पणजीतल्या व्हिवा गोवा हॉटेलवर छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
Aug 28, 2013, 09:30 AM IST