government

मोदी सरकारनं दिली कामगारांसाठी खुशखबर...

मोदी सरकारनं कामगारांसाठी एक खुशखबर दिलीय. सरकारनं कामगारांच्या किमान वेतनात 23 रुपयांनी वाढ केलीय. त्यामुळे आता कामगारांना किमान 160 रुपये प्रतिदिन मजुरी मिळू शकेल. 

Jul 8, 2015, 08:54 AM IST

मदरशांत शिकणारे 'विद्यार्थी' नव्हेत; राज्य सरकारचा फतवा

महाराष्ट्रात मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आता विद्यार्थ्यांचा दर्जा मिळणार नाही. या मुलांची गणना यापुढे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रुपात होणार नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. 

Jul 2, 2015, 04:04 PM IST

मालेगाव स्फोट : सरकारी वकील सालियन यांचा गंभीर आरोप

मालेगाव स्फोटांच्या खटल्यातल्या सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी गंभीर आरोप केलेत. केंद्रात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणातल्या आरोपींविरोधात आपल्याला नरम होण्यास सांगितलं गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, आम्ही कुणावरही दबाव टाकलेला नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

Jun 25, 2015, 08:28 PM IST

योगाचा इस्लामला धोका : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

  हिंदू संस्कृतीचा इस्लामला धोका आहे, हे लक्षात घेऊन इमामांनी आता आंदोलन करण्यासाठी तयार राहा. शुक्रवारी नमाजासाठी मशिदीत येणाऱ्या लोकांना आंदोलनासाठी सज्ज केले पाहिजे, असे धक्कादायक पत्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने लिहिलेय.

Jun 23, 2015, 10:57 PM IST

अजित पवार, तटकरेंना वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी नको- राज

 अजित पवार आणि सुनील तटकरे यांना वाचवण्यासाठी छगन भुजबळांचा बळी, असा प्रकार नको, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.  छगन भुजबळांबद्दल आपण विधानसभेच्या प्रचारातही बोललो होतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Jun 23, 2015, 02:37 PM IST

प्रकल्पासाठी दादरकरांना हात लावू देणार नाही - राज ठाकरे

दादरमधील मेट्रो वादावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये आता चांगलीच स्पर्धा रंगताना दिसतेय. शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं असताना तर दुसरीकडे प्रकल्पबाधित दादरकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहचलं. या भेटीनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेसह युती सरकारवर टीकेची झोड उठवलीय. 

Jun 16, 2015, 02:41 PM IST

ललित मोदींना मदत केल्याने स्वराज अडचणीत

ललित मोदी यांना भारतात येण्यासाठी ट्रॅव्हल्स व्हिसा देण्यास मदत केल्या प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज अडचणीत आल्या आहेत. ललित मोदी हे आयपीएलमधील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आहेत.

Jun 14, 2015, 03:05 PM IST

मोदी सरकारची दिल्लीत निघाली 'वरात'

नरेंद्र मोदी सरकारला एकवर्ष पूर्ण झाल्याने, युवक काँग्रेसकडून आज निषेध करण्यात आला. मोदी सरकारच्या घोषणांची वरात काढत, युवक काँग्रेसने निषेध नोंदवला.

May 26, 2015, 04:55 PM IST

महिलांकडून मोदी सरकारचं रिपोर्ट कार्ड...

महिलांकडून मोदी सरकारचं रिपोर्ट कार्ड... 

May 26, 2015, 04:43 PM IST

वसतिगृहात अपंग अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपासून बलात्कार

नागपूरच्या शासकीय अपंग वसतिगृहात दोघा नराधमांनी एका अल्पवयीन अपंग मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय. 

May 22, 2015, 10:48 AM IST