sangli

सावधान! ताकारी गावाचं होऊ शकतं दुसरं माळीण!

सांगली जिल्ह्यातील सागरेश्‍वर डोंगरकडांना भेगा पडल्यात. इथले मोठ-मोठे पाषाण कोसळण्याच्या स्थितीत आहेत.. त्यामुळं डोंगराच्या पायथ्याशी असलेलं ताकारी गावाच्या पंचक्रोशीवर माळीणसारख्या दुर्घटनेची टांगती तलवार लटकतेय. 

Aug 11, 2014, 03:09 PM IST

‘ज्यांना शिवसेनेत यायचंय, त्यांनी लवकरात लवकर यावं’ - उद्धव

 

सांगली: ज्यांना शिवसेनेत यायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर यावं, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्लामपुरात दिलाय. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

नुकताच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आपण लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. 

Jul 13, 2014, 03:09 PM IST

'सख्खे' शेजारी असे बनतात 'पक्के' वैरी!

तुमच्या घरातून बाहेर पडण्याचा मार्गच कुणी बंद करून टाकला तर...? नुसत्या कल्पनेनंच अंगावर काटा उभा राहतो. पण सांगलीतल्या एका कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्यांनीच ही आफत आणलीय. दुर्दैव म्हणजं आपल्या सुटकेसाठी हे कुटुंब टाहो फोडतंय. पण गृहमंत्री आर. आर. पाटलांच्या जिल्ह्यातच पोलीस खातं आणि पालिका प्रशासन ढिम्म बसून आहे.

Jul 9, 2014, 08:53 PM IST

राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात मोठा धक्का, अजितराव घोरपडे भाजपात

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय़. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आणि विजयानंतर आता अजित घोरपड्यांच्या भाजप प्रवेशामुळं सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. 

Jul 7, 2014, 09:33 PM IST

विधानसभेच्या तोंडावर सांगलीत राष्ट्रवादीला हादरा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसलाय. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. 

Jul 7, 2014, 10:34 AM IST