मुंबई : तुम्हाला निरोगी राहण्यासाठी केवळ सकस आहार घेणे आवश्यक नाही तर ते योग्य वेळी खाणे देखील खुप आवश्यक आहे. मात्र आजकालच्या धावपळीच्या जगात ते होत नाही. अनेकजण दुपारच्या कोणत्याही वेळेत जेवतात. त्यामुळे या जेवणाच्या (Late Lunch) त्याच्या शरीरावर वाईट परीणाम होतो. त्यामुळे नेमक उशिरा जेवण्याच्या काय समस्या आहेत, त्या जाणून घेऊयात.
दुपारच्या जेवणाला (Late Lunch) उशीर केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. आज आम्ही तुम्हाला या समस्यांबद्दल सांगत आहोत.
जेव्हा तुम्ही दुपारचे जेवण (Late Lunch) उशिरा जेवता तेव्हा तुमची पचनसंस्था नीट काम करत नाही. आयुर्वेदानुसार, व्यक्तीने दुपारी 12 ते 2 या वेळेत जेवण केले पाहिजे. यावेळी, तुमच्या शरीरात पित्ताचे प्राबल्य असते, जे अन्न पचण्यास खूप मदत करते. अशा स्थितीत जेवण उशिरा केल्यास त्यातून ऊर्जा मिळण्याऐवजी चरबीचे रूपांतर अन्नात होते.
जेव्हा तुम्ही दुपारचे जेवण (Late Lunch) उशिरा करता तेव्हा तुमचे पोट भरलेले राहते.त्यामुळे तुम्ही रात्रीचे जेवणही उशिरा करता. अशा परिस्थितीत जर तुम्ही झोपायच्या आधी खाल्ले तर तुम्हाला पोटात जळजळ, गॅस, निद्रानाश आणि फुगण्याची समस्या होऊ लागते.
दुपारचे जेवण उशिरा (Late Lunch) केल्याने व्यक्तीची चयापचय क्रिया मंदावते. जर तुम्ही न्याहारी करून थेट दुपारचे जेवण केले आणि तेही वेळेवर केले नाही तर चयापचय हळूहळू मंदावायला लागतो. त्यामुळे झपाट्याने वजन वाढते.
जेवण वेळेवर न घेतल्यास डोकेदुखी किंवा चिडचिड होऊ शकते. त्याच वेळी, जेवण वेळेवर (Late Lunch) न केल्यामुळे, तुम्हाला तुमच्या कामात लक्ष केंद्रित करण्यात त्रास होतो आणि काम करावेसेही वाटत नाही.
अन्न हे आपल्या शरीरासाठी उर्जेचा मुख्य स्त्रोत आहे, परंतु जेव्हा तुम्ही दुपारचे जेवण (Late Lunch) उशिरा जेवता तेव्हा त्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशी ऊर्जा निर्माण होत नाही. यामुळे तुम्हाला खूप ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)