अभिनेता परेश रावल गुजरातमध्ये सर्वांत श्रीमंत उमेदवार
भारतीय जनता पक्षाचे पूर्व अहमदाबादचे उमेदवार अभिनेते परेश रावल हे गुजरातमधील सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी नुकत्याच भरलेल्या उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे पत्नी आणि मुलांची मिळून सुमारे 80 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं उघड झालंय.
Apr 10, 2014, 01:42 PM ISTपत्नीचं नाव जशोदाबेन, मोदींची पहिल्यांदाच जाहीर कबुली
आत्ताआत्तापर्यंत आपल्या वैवाहिक स्थितीवर चुप्पी साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आपण विवाहीत असून आपल्या पत्नीचं नाव `जशोदाबेन` असल्याची जाहीर कबुली शपथेवर दिलीय. त्यामुळे, मोदींचं हे `ओपन सिक्रेट` आता जगजाहीर झालंय.
Apr 10, 2014, 07:42 AM ISTमुंडे भाजपची 'गोमु' - आर आर पाटील
भाजपमधील लोकांना आपली नावं बदलण्याची सवयच आहे. नमो म्हणजे नरेंद्र मोदी तर गोमु म्हणजे गोपीनाथ मुंडे असल्याची टीका गृहमंत्री आर. आर. पाटलांनी केलीय.
Apr 9, 2014, 10:36 PM ISTखुनाचा आरोप असणारे डॉ.पद्मसिंग पाटील बाहेर कसे - उद्धव
भ्रष्टाचाराचे आरोप असणारे शिवसेनेचे सुरेश जैन तुरुंगात तर खुनासारखा गंभीर आरोप असणारे राष्ट्रवादीचे डॉ.पद्मसिंग पाटील बाहेर कसे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना केलाय. हे काँग्रेस आघाडीचे कटकारस्थान आहे, असा आरोप उद्धव यांनी केला आहे.
Apr 9, 2014, 08:44 PM ISTनागपूर, विदर्भात दहा जागांसाठी 201 उमेदवार रिंगणात
निवडणुकीसाठी संपूर्ण विदर्भ सज्ज झालाय. 10 लोकसभा मतदारसंघात एकूण 201 उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 33 तर अकोला मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे सात उमेदवार आहेत. मतदानाच्या निमित्ताने सर्वच मतदारसंघात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Apr 9, 2014, 07:58 PM ISTराष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचाच राणेंवर हल्लाबोल
काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनीही `घरचा आहेर` दिल्यानं उद्योगमंत्री नारायण राणेंची डोकेदुखी आणखी वाढलीय. राणेंनी सिंधुदुर्गातली काँग्रेस संपवली. आता जी अस्तित्वात आहे ती राणे समर्थक काँग्रेस आहे, असा तिखट हल्ला सावंत यांनी चढवलाय.
Apr 9, 2014, 06:57 PM ISTसुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी काहीच केलं नाही- मोदी
वडोदऱ्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दाखल झाले. सांगलीत त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी `सांगली बनवूया चांगली`चा नारा दिला. त्यानंतर घराणेशाहीवर सडकून टीका करत घराणेशाही विकासाला खीळ बसवत असल्याचं म्हटलंय.
Apr 9, 2014, 06:48 PM ISTरायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे, घड्याळ विरुद्ध घड्याळ!
रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे अशी एक रंगतदार लढत रंगणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून सुनील शाम तटकरे या नावाच्या व्यक्तीनंही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे इथं एक वेगळीच रंगत निर्माण केलीय.
Apr 9, 2014, 03:44 PM IST`कारगिलचा विजय हिंदू नाही तर मुस्लिम सैनिकांमुळे`
बऱ्याचदा आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यांसाठी चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी पुन्हा असंच एक बेजबाबदार आणि वादग्रस्त विधान केलंय.
Apr 9, 2014, 08:12 AM ISTलोकसभा : दुसऱ्या टप्प्यातील ६ जागांसाठी आज मतदान
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज सहा जागांसाठी मतदान होणार आहे.
Apr 9, 2014, 07:49 AM ISTविदर्भातील निवडणूक प्रचार थंडावलाय
लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातल्या प्रचारातल्या तोफा थंडावल्या आहेत. तिस-या टप्प्यातलं मतदान 10 तारखेला होणार आहे. तिस-या टप्प्यात देशभरातल्या 92 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात विदर्भातल्या 10 जागांचाही समावेश आहे.
Apr 8, 2014, 10:05 PM ISTकोकणात राणेंविरोधात सर्व विरोधक - संजय राऊत
कोकणातील लोकसभेची निवडणूक नीलेश राणे विरुद्ध सर्व विरोधक अशी आहे. ही निवडणूक शिवसेना जिंकेल कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावात पाहायला मिळेल, असा आशावाद शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिंधुदुर्गात व्यक्त केलाय.
Apr 8, 2014, 09:04 PM ISTशिवसेनेची बिकट परिस्थिती, मुद्दे नसल्याने वडा, सूपवर - राणे
शिवसेनेची परिस्थिती बिकट आहे, त्यांच्याकडे मुददे नाहीत. म्हणून ते वडा आणि सूपवर आलेत, अशी टीका नारायण राणेंनी पुण्यात केलीय.
Apr 8, 2014, 08:30 PM ISTराजनाथ सिंहांनी धुडकावला राज ठाकरेंचा पाठिंबा!
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी राज ठाकरेंच्या मनसेला उद्देशून चांगलाच टोला लगावलाय. `मी ऐकलंय की कुणीतरी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतंय... पण मोदींना पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांना महायुतीत सामील व्हावं लागेल.. किंवा त्यांना आपला पक्ष भाजपमध्ये विलिन करावा लागेल. त्याशिवाय केवळ पाठिंबा देण्याच्या भाषेला काहीच अर्थ नाही, असं राजनाथ सिंह यांनी पुण्यात बोलताना सांगितलं.
Apr 8, 2014, 08:21 PM ISTऔरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा कोणता झेंडा घेऊ हाती?
औरंगाबादमधील प्रचार आता शिगेला पोहचलाय. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोमात कामाला लागलेत. मात्र मनसे कार्यकर्ते मात्र या सगळ्यापासून दूर आहेत. अजूनही कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडलाय.
Apr 8, 2014, 07:48 PM IST