शेतकरी

एकाच दिवशी पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

एकाच दिवशी पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Dec 3, 2014, 08:58 PM IST

महाराष्ट्र जळतोय; सत्ताधाऱ्यांत 'लॅव्हिश' चर्चा!

दुष्काळाच्या दुष्चक्रात अडकलेल्या या शेतकऱ्याला तातडीनं मदतीचा हात देण्याची गरज आहे. मात्र... 

Dec 3, 2014, 07:38 PM IST

मराठवाड्यात एकाच दिवशी ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि त्यामुळं वाढलेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्यानं मंगळवारी मराठवाड्यातील पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. लातूर जिल्ह्यातील तीन आणि बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका घटनेनं मराठवाडा हादरून गेला.

Dec 3, 2014, 10:53 AM IST

हिंगोलीत दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठवाड्यात दुष्काळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्र थांबण्याच नाव घेत नाही आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. एकानं रेल्वे खाली येऊन जिवन संपलं तर दुसऱ्यानं औषध पिऊन मृत्यूला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याची गरज निर्माण झालीय.

Dec 2, 2014, 12:30 PM IST

शेतकऱ्याला नुकसानापोटी केवळ ६ रुपये

हिंगोलीमध्ये राष्ट्रीय पिक विमा कंपनीनं पिक विम्याचे केवळ ६ रुपये देऊन बळीराजाची क्रूर चेष्टा केल्याचं वृत्त झी मीडियानं दाखवलं. यावर सरकारला जाग आली असून या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलंय.

Nov 25, 2014, 04:38 PM IST

खडसे म्हणजे भाजपचे अजित पवार, उद्धव ठाकरेंची टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी खडसेंची तुलना थेट अजित पवारांसोबत करत, खडसे म्हणजे भाजपचे अजित पवार असं म्हटलंय.

Nov 24, 2014, 07:37 PM IST

मोबाईलची बिलं भरता, मग वीजबिलं का नाही?-खडसे

राज्याचे बराच काळ विरोधीपक्ष नेते असलेले एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.  कारण, मोबाईल फोनची बिलं भरायला पैसे आहेत, मग वीजबिलं का भरता येत नाहीत?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांना केला आहे.

Nov 24, 2014, 10:06 AM IST