शेतकरी

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर

शेकडो कोटींचं नुकसान झाल्यानंतर आणि अनेक शेतक-यांचे बळी गेल्यानंतर अखेर निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्या सत्ताधा-यांना जाग आली आहे.

Mar 19, 2014, 10:25 PM IST

'उमवि'च्या कुलगुरूंनी दिला शेतकऱ्यांना महिन्याचा पगार

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांनी गारपीट आणि अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीला हात भार लावला आहे.

Mar 13, 2014, 06:46 PM IST

धुळ्यात गारपीटग्रस्त दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

Mar 12, 2014, 08:56 PM IST

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

Mar 12, 2014, 07:15 PM IST

संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पेंड्या फेकल्या

बुलडाणा जिल्ह्यातच गारपीटग्रस्त शेतक-यांचा संताप मुख्यमंत्र्यांना अनुभवायला मिळाला. नुकसानग्रस्त शेतक-यांनी गाडीवर हरब-याच्या पेंडी फेकल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

Mar 12, 2014, 07:08 PM IST

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

Mar 12, 2014, 03:47 PM IST

मुलीच्या लग्नाआधीच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

मराठवाडयात गारपीट लोकांच्या जीवावर उठलीय. आत्तापर्यंत गारपीटीनं २० पेक्षा जास्त बळी घेतलेत. २०० पेक्षा जास्त जनावरं मेलीत. या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे. हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करुन जीवन संपवल्यानं परिसरालाच धक्का बसलाय.

Mar 10, 2014, 09:23 PM IST

गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीनं शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय. हातात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालंय.

Mar 4, 2014, 05:03 PM IST

स्ट्रॉबेरी खायचीय... मग चला की, कोल्हापूरला!

स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्वर... पण आता महाबळेश्वरमध्ये मिळणारी उत्कृष्ठ दर्जाची स्ट्राबेरी कोल्हापूरातसुद्धा पिकतेय. ऐकून चकीत झालात ना... होय पण हे खरं आहे.

Feb 15, 2014, 08:42 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ

नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कृषीसंबंधी कार्यक्रमात विदर्भातल्या शेतक-यांनी मोठा गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातला शेतकरी थेट उभा राहून कापसाच्या दरावरून घोषणा देऊ लागला.

Feb 13, 2014, 11:06 PM IST

गुहागरमधील एमआयडीसीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या देवघर गावात एमआयडीसी भू संपादन अधिकारी गेले आसता ग्रामस्तानी तीव्र विरोध करीत भू संपादन प्रक्रिया बंद पाडली. याच वेळी MIDC अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करत प्रस्तापित MIDC ला विरोध करीत कडवट आंदोलनाचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Feb 5, 2014, 11:57 PM IST

शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी मातोश्रीवर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मातोश्रीवर पोहोचले आहेत. यामुळे महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश होईल का?, या चर्चेला उधाण येणार आहे.

Jan 7, 2014, 12:50 PM IST

येवल्यातील सामान्य शेतकऱ्याची मुलगी झाली पायलट

जिद्द असेल तर कितीही बिकट परिस्थितीवर मात करुन आकाशाला गवसणी घालता येते हे नाशिक जिल्ह्यातल्या निर्मला खळेनं दाखवून दिलंय. घरच्या अडचणीवर मात करुन ही ग्रामीण भागातली मुलगी आज पायलट झालीय. तिच्या या आकाश भरारीचा पाहू या या स्पशेल रिपोर्ट.

Dec 18, 2013, 07:54 PM IST

पोलिसांनी महिला आणि शेतक-यांना झोडपले

सांगली जिल्ह्यातल्या खंबाळे गावात एमआयडीसीसाठी जबरदस्तीने जमिनीची मोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली.. यावेळी महिला आणि शेतक-यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली.खानापूर तालुक्यातील खंबाळे गावात एमआयडीसी मंजूर आहे. सुमारे पावणे पाचशे एकर जमीन या प्रकल्पात जाणार आहे.

Dec 8, 2013, 03:07 PM IST

बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी हजारो शेतकऱ्यांची सरकारी योजनेच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला आहे. तर या प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सत्ताधारी राका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Nov 29, 2013, 10:06 AM IST