ऊसाची भरपाई छातीवर बसून काढून घेऊ - राजू शेट्टी
यावर्षी ऊसाला पहिली उचल ३ हजार रुपये विनाकपात मिळाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा छातीवर बसून भरवाई घेऊ, असा इशारा देत शेतकरी संघटनेनं यासाठी राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीय. मागणी मान्य न झाल्यास १५ नोव्हेंबरपासून कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आंदोलनाचा इशारला शेट्टी यांनी दिलाय.
Nov 8, 2013, 10:49 PM ISTबटाट्याचे भाव कडाडले, मुंबईकरांचे वडापाव तोंडचे पाणी पळवणार
कांदा आणि टोमॅटोच्या पाठोपाठ आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. केंद्र सरकारने काद्याच्या किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे. एका टनाला ७१४७२ रुपये अशी विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरम्यान, बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.
Nov 6, 2013, 09:56 PM ISTशेतकऱ्यांचा ठेचा भाकर मोर्चा
विविध मागण्यांसाठी बुलडाण्यातल्या शेतकऱ्यांनी ठेचा भाकर आंदोलन केलं. उत्पादन खर्चाच्या तुलनेत सोयाबीनला सरकारकडून दिला जाणार हमीभाव अत्यंत कमी आहे.
Nov 3, 2013, 11:04 PM ISTऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी `काळी दिवाळी`?
देशात दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलीय.
Oct 30, 2013, 06:33 PM ISTएक रुपयांत शेतकऱ्यांना पोटभर जेवण!
एक रुपयांत शेतक-याना पोटभर जेवण... हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल... खामगावची कृषी उत्पन्न बाजार समितीने हे करुन दाखवलंय..
Oct 16, 2013, 07:42 AM ISTनिर्यातबंदी लादल्यास अफू, गांजा आणि भांगेची लागवड!
राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन खान्देशात होतं.. यंदा खान्देशात कापसाला चांगला दर मिळालाय. मात्र हा दर कायम राहणार का पुन्हा शेतक-यांच्या पदरी निराशा येणार अशी काळजी बळीराजाला सतावतेय...
Oct 15, 2013, 09:24 AM ISTपावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच
पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..
Sep 30, 2013, 06:28 PM ISTओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
धुळे जिल्ह्यातल्या न्याहळोद गावात ओल्या दुष्काळाला कंटाळून एका 56 वर्षीय शेतक-यानं आत्महत्या केलीये. मधुकर कोळी असं त्यांचं नाव आहे. कर्जबाजारीपणा आणि नापीकीचं संकट समोर दिसत असल्याने विष पिउन त्यांनी जीवन यात्रा संपवली आहे.
Sep 29, 2013, 11:02 PM ISTही मनसेवर नामुष्की आहे का?
नाशिक शहराचा प्रारुप विकास आराखडा अखेर रद्द करण्यात आलाय. आक्रमक विरोधक आणि शेतकऱ्यांपुढं सत्ताधारी मनसेला अखेर माघार घ्यावी लागली. पालिकेच्या महासभेत ११ तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर महापौरांनी प्रारूप आराखडा रद्द करण्याची घोषणा केलीय.
Sep 24, 2013, 01:23 PM ISTकलावतीला घ्यायचीय राहुल गांधींची भेट!
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज विदर्भ दौऱ्यावर येतायत. त्यामुळं या दौऱ्यात त्यांच्या भेटीची आस यवतमाळमधील शेतकऱ्याची विधवा कलावती हिला लागलीय. नागपूर दौऱ्यात काँग्रेसच्या युवराजांना भेटण्याची इच्छा तिनं व्यक्त केलीय.
Sep 24, 2013, 10:53 AM ISTकाँग्रेसचा गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीची फिल्डींग
काँग्रेसचे नेते पी. के. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेसचा गड असलेला नंदुरबार जिल्हा काबीज करण्याकडे राष्ट्रवादीनं आगेकूच केली. खुद्द राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यानं बिगर आदिवासींचं ध्रुवीकरण करण्यात राष्ट्रवादीला यश आलं.
Sep 18, 2013, 12:28 PM ISTशेतात आढळला चंदनाचा साठा!
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व इंदापूर तालुक्यातील बाभूळगावी एका शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणावर चंदनाचा साठा आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Sep 12, 2013, 08:32 PM IST‘पोळा’ सणावर महागाईचं सावट!
पोळा.. बळीराजासाठी सगळ्यात महत्वाचा सण... यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळं हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाई आणि ओल्या दुष्काळाचं सावट आहे.
Sep 5, 2013, 10:07 AM ISTकांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा!
कांद्याने सध्या सगळ्यांचाच वांदा केलाय... कांद्याच्या किंमती भडकल्यानं ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आलंय... मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळं कांद्याची भाववाढ झाल्याचं तर्कशास्त्र कृषीमंत्री शरद पवार मांडतायत...
Aug 16, 2013, 07:56 PM ISTमावळ घटनेला २ वर्षं पूर्ण!
मावळ गोळीबाराची घटना 9 ऑगस्ट 2011 ला घडली. त्याला उद्या 2 वर्ष पूर्ण होत आहेत. हे आंदोलन घडण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या.
Aug 8, 2013, 07:55 PM IST