24taas

सावधान! आता व्हॉट्स अॅपही होतंय हॅक, तरुणीला गंडा!

हॅकिंग... आताशी ही बाब कॉमन झालीय आणि या हॅकिंगनं अनेकांना गंडवलंय सुद्धा. आपलं नेट अकाऊंट, बँकिंग अकाऊंट हॅक होऊन रक्कम चोरीला गेल्याचं अनेकदा ऐकलं असेल. पण व्हॉट्स अॅप हॅक करून गंडा घालणं हे कसं शक्य आहे. हे सत्य आहे... 

Nov 24, 2014, 08:08 PM IST

खडसे म्हणजे भाजपचे अजित पवार, उद्धव ठाकरेंची टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी खडसेंची तुलना थेट अजित पवारांसोबत करत, खडसे म्हणजे भाजपचे अजित पवार असं म्हटलंय.

Nov 24, 2014, 07:37 PM IST

सुझान आणि रामपालच्या अफेरच्या बातमीवर हृतिक भडकला!

अभिनेता हृतिक रोशन आणि अर्जुन रामपाल आज एकदम भडकलेले दिसले आणि त्यांनी ट्विटरवरून आपला संतापही व्यक्त केलाय. एका इंग्रजी वृत्तपत्रात हृतिकची एक्स पत्नी सुझान खान आणि अभिनेता अर्जुन रामपालच्या अफेरची बातमी होती. त्यात लिहिलं होतं की, अर्जुन आणि सुझान खूप जवळचे मित्र आहेत. त्यांची मैत्री आता इतकी जवळ येतेय की त्यामुळं अर्जुन रामपालची पत्नी आणि सुझानच्या मैत्रीतही तणाव निर्माण होतोय. 

Nov 24, 2014, 06:33 PM IST

श्याओमीचा नोट आज भारतात होणार लॉन्च!

चीनची मोबाईल कंपनी श्याओमीच्या ५.५ इंचचा स्मार्टफोन ‘रेडमी नोट’ आज भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीनं यापूर्वी 'Redmi-1S' आणि Mi-3' लॉन्च केलेले आहेत. ज्यांना ग्राहकांची चांगलीच पसंत मिळाली. ‘रेडमी नोट’ला श्याओमी फॅबलेट कॅटेगरीमध्ये लॉन्च करणार आहे. याची किंमत जवळपास १० हजार रुपयांपर्यंत असेलं. 

Nov 24, 2014, 05:48 PM IST

'२०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं'

२०२०पर्यंत पाकिस्तानकडे २००पेक्षा अधिक अण्वस्त्रं असतील इतकी क्षमता पाकिस्ताननं अण्वस्त्र कार्यक्रमांमधून धारण केली असल्याचं अमेरिकी थिंक टँकचं म्हणणं आहे. यासंबंधातील एक अहवाल तयार करण्यात आला असून धोरणात्मक स्थैर्य यासंबंधात हा अहवाल आहे. 

Nov 24, 2014, 05:12 PM IST

एकदा कापल्यानंतर पुन्हा कसे आणि का येतात नखं?

नखं एकदा कापल्यानंतर पुन्हा का उगवतात? याचा शोध घेतांना संशोधकांना नखांमध्ये एक नव्या प्रकारच्या स्टेम पेशी गट सापडला. त्यांच्यामते याच स्टेम पेशीमुळं नखं आणि त्याला जोडून असलेली त्वचा पुन्हा उगवण्यास मदत होते. 

Nov 24, 2014, 04:50 PM IST

स्पॉट फिक्सिंगमुळं क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात - सुप्रीम कोर्ट

क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असून तो खेळाडू वृत्तीनंच खेळला गेला पाहिजे, पण तुम्ही फिक्सिंगसारख्या प्रकारांना पाठिशी घालून क्रिकेटलाच संपवत आहात अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयची कानउघडणी केली आहे. 

Nov 24, 2014, 04:14 PM IST

तिची आत्महत्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासातून, तिघांना अटक

मुलुंडमध्ये शनिवारी एका अल्पवयीन मुलीनं महावीर टॉवर या १२ मजली रहिवासी इमातीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या मुलीच्या आत्महत्येचं गुढ आता उकललं असून आरोपीच्या एकतर्फी प्रेमातून ही घटना झाल्याच समोर आलंय. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

Nov 24, 2014, 03:56 PM IST

हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षच - संजय राऊत

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेऊ, असं भाजपाचे नेते सांगत असले तरी शिवसेना नेत्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावत सरकारला धारेवर धरेल असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

Nov 23, 2014, 10:17 PM IST

भाजप-सेनेची बोलणी आता मंत्र्यांच्या शपथविधीवर अडली - सूत्र

शिवसेना-भाजप युतीसंदर्भात बोलणी पुन्हा सुरू झाल्याचं कळतंय. मात्र ही बोलणी आता बोलणी मंत्र्यांच्या शपथविधीवर अडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Nov 23, 2014, 09:16 PM IST