uddhav thackeray

मोदी, राहुल संसदेत बोलत नाही, मात्र जनता सर्व ऐकत आहे : उद्धव ठाकरे

राहुल गांधी म्हणतात मला संसदेत बोलू दिले जात नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मला बोलू दिले जात नाही, पण जनता समजूतदार आहे. जनता पाहात आहे कोण काय बोलतंय ते, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.   

Dec 15, 2016, 07:49 PM IST

'मुंबई न तुंबल्याची दखल कोणीच घेतली नाही'

यंदा मुंबई तुंबली नाही याची कोणीही दखल घेतली नाही. याचबरोबर गेल्यावर्षी डेंग्यूची जी भयानकता होती ती भयानकता यावर्षी दिसली नाही याचं श्रेय मुंबई महापालिकेला द्यावं लागेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Dec 11, 2016, 08:07 PM IST

बच्चू कडू - उद्धव ठाकरे यांची भेट, शिवसेना-प्रहार संघटना शेतकरी प्रश्नावर आक्रमक

आमदार बच्चू कडू यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नोटबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांची प्रहार संघटना आंदोलन छेडणार आहे.

Dec 10, 2016, 08:43 PM IST

'मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या बाजूला बसवा'

ठाणे मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या बाजूला बसवा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरनाईक यांनी ही मागणी केली आहे. ठाणे-कासारवडवली मेट्रोचे भूमिपूजनाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात मोदींच्या शेजारी उद्धव यांना बसवण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.

Dec 8, 2016, 03:35 PM IST

नोटबंदीच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नोटबंदीचा खोचक प्रतिक्रिया

Dec 8, 2016, 03:25 PM IST

नोटबंदीनंतर उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीत भाजप नेते, मंत्र्यांशी गाठीभेटी

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट  घेतली. राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी त्यांची बैठक झाली. ही भेट तब्बल ४५ मिनिटांची होती. मात्र भेटीचे कारण अस्पष्ट राहिले. दरम्यान, नोटबंदीबाबत सामान्यांना त्रास होत असल्याने याचा विचार करावा, याबाबत चर्चा झाल्याचे समजते. 

Dec 7, 2016, 11:36 PM IST

उद्धव ठाकरे आणि सरसंघचालक भागवत यांच्यात ४० मिनिटे चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची राष्ट्रीय सेवा संघ मुख्यालयात भेट घेतली. त्यांनी नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ही आमची इच्छा, ही सर्वांचीच इच्छा आहे. याबाबत चर्चा उद्धव यांनी केली. जवळपास  ४० मिनिटे चर्चा बंद दाराआड झाली. त्यामुळे अधिक तपशिल मिळू शकला नाही.

Dec 4, 2016, 01:59 PM IST

'मेट्रो'चे अधिकारी मातोश्रीवर

गिरगावात मेट्रो तीन प्रकल्पाचे बांधकाम स्थानिक रहिवाश्यांनी बंद पाडल्यानंतर मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी आणि मुंबई मेट्रो रेल कॉरपोरशन च्या प्रमुख अश्विनी भिडे यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Dec 3, 2016, 10:16 PM IST

मोदींच्या नोटबंदीवर पुन्हा उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

मुंबईत आल्यानंतर आणि मुंबईकरांनाही देखील आपल्या परिवारासह जायचं कुठे हा प्रश्नं पडतो. ते इकडे तिकडे फिरतात. खरेदी वगैरे किती करतात याची कल्पना नाही. आता नोटबंदीमुळे तेही सगळं ढेपाळून गेले आहे. 

Dec 3, 2016, 03:45 PM IST

मनोहर जोशींच्या पुस्तक प्रकाशनात उद्धव ठाकरे

मनोहर जोशींच्या पुस्तक प्रकाशनात उद्धव ठाकरे

Dec 2, 2016, 09:28 PM IST

नगरपरिषद निवडणुकीतील विजयाचं श्रेय शिवसैनिकांना : उद्धव ठाकरे

राज्यात नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. या विजयाचे श्रेय मी माझ्या शिवसैनिकांना देतो, असे सांगत मी निवडणूक प्रचारात उतरलेला नाही. सच्चा शिवसैनिकाची ताकद काय असते, हे दाखवून दिले आहे. तसेच शिवसेनेवर विश्वास दाखविणाऱ्या जनतेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिले.

Nov 29, 2016, 02:27 PM IST