भयंकर! पोटच्या गोळ्यालाच मारून भरलं पोट…
उत्तर कोरियात पडलेल्या दुष्काळानं आपल्याच पोटच्या गोळ्याला मारून खाण्याची वेळ नागरिकांवर आलीय. भूकेचा कहर या नागरिकांवर असा काही कोसळलाय की, कबरीमध्ये पुरलेल्या आपल्या नातेवाईकांचे मृतदेहही उकरून काढून या नागरिकांना खावे लागत आहेत.
Jan 30, 2013, 11:58 AM IST`हिवाळ्यात`च दुष्काळानं जिल्हा उघड्यावर!
दुष्काळानं होरपळलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आता आणखी एक संकट ओढवलंय. सातबाऱ्यावर कर्जाची थकबाकी दिसत असल्यानं नवीन पीक कर्ज मिळणं अवघड झालंय. दुष्काळाचा सामना करण्यासाठी बळीराजावर घरची इभ्रतच गहाण ठेवण्याची वेळ आलीय.
Jan 11, 2013, 04:06 PM ISTदुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून ७७८ कोटींची मदत जाहीर
राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून 778 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अर्थमंत्री पी चिदम्बरम नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोन्टेकसिंग अहलुवालिया यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
Jan 10, 2013, 08:06 PM ISTशीतपेयांचं पाणी शेतीकडे वळणार!
राज्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शीतपेयासाठी देण्यात येणारं पाणी थांबवून हे शेतीसाठी देण्याकरता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवणार आहेत.
Jan 7, 2013, 06:23 PM ISTदुष्काळाने घेतला लहानग्याचा बळी
दुष्काळानं परिसीमा गाठली आहे. दुष्काळ आता थेट जीवावरच उठलाय. औरंगाबाद जिल्ह्यात लाडसावंगी गावात दुष्काळानं एका 13 वर्षीय मुलाचा बळी घेतलाय.
Dec 31, 2012, 08:51 PM IST‘केंद्राकडे मदत कशी मागतात हेही माहित नाही?’
राज्याच्या दुष्काळाच्या नियोजनावर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी टीका केलीय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळं पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा सल्ला पवारांनी दिलाय.
Aug 29, 2012, 02:16 PM ISTकेंद्राच्या मदतीतही ‘दुष्काळ’! राज्य सरकार तोंडावर...
दोन दिवस पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिगटाशी झालेल्या चर्चांमध्ये प्रस्ताव ठेवण्यात आले. मात्र, त्यावर तातडीने निर्णय झालेला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या पदरी निराशा आलीय. यातून राज्य सरकारचा आततायीपणा पुन्हा एकदा समोर आलाय.
Aug 26, 2012, 10:46 AM ISTआकडे दुष्काळी, त्यात जनतेचा बळी
पावसाच्या आकडेवारीवरून राज्य सरकारनं दुष्काळी तालुक्याची घोषणा केली. मात्र धुळे जिल्ह्यात याच आकडेवारीच्या सावळ्या गोंधळामुळे साक्री तालुक्याला राज्य सरकारच्या मदतीपासून वंचित रहावं लागलंय. या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतांनाही प्रशासनानं दिलेल्या चुकीच्या आकडेवारीच्या खेळात जनतेचा बळी गेलाय.
Aug 24, 2012, 07:30 PM ISTराज्य सरकारचं शिष्टमंडळ दिल्ली दरबारी
दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज दिल्लीला जाणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.
Aug 24, 2012, 11:45 AM ISTदुष्काळ जाहीर, मदतीसाठी केंद्राकडे धावा...
राज्यातल्या १२२ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. राज्य सरकारनं ही घोषणा केलीये. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि ५० टक्क्यांपेक्षा कमी पेरण्या झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय.
Aug 23, 2012, 11:51 AM ISTमहाराष्ट्रातील ६८ तालुके दुष्काळग्रस्त!
राज्यातले ६८ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि पेरणी झालेले तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त भागात करण्यात येईल.
Aug 17, 2012, 01:51 PM ISTदुष्काळावरील मुकाबल्यासाठी मंत्र्यांची बैठक
देशात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी केंद्राच्या विशेष मंत्रिगटाची बैठक होतेय. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
Jul 31, 2012, 12:15 PM ISTपावसासाठी... बेडकाचं अन् गाढवाचं लग्न
राज्यात मान्सून बरसला असला तरी काही भाग मात्र अजूनही कोरडाच आहे. सोलापूरमध्येही पावसाची वाट पाहतोय. पाऊस पडावा यासाठी शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयत्नही सुरू आहेत. यातलाच एक प्रयत्न म्हणजे बेडकाचं लग्न... अगदी साग्रसंगीत पद्धतीनं तब्बल तीन दिवस हा सोहळा पार पडला.
Jul 13, 2012, 04:21 PM ISTदुष्काळ निवारणासाठी २ हजार ६२५ कोटी
राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने २ हजार ६२५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलीय. विधानसभेत दुष्काळ स्थितीबाबत झालेल्या जोरदार चर्चेनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी ही घोषणा केलीय.
Jul 12, 2012, 09:30 AM ISTरेशनकार्ड मान्य, पण मिळत नाही धान्य
राज्यात दुष्काळामुळं जनता त्रासलीय. पाण्यासाठी सुरू असलेली वणवण असह्य झालेल्या अनेकांनी मुंबईची वाट धरलीय. पण इथेही त्यांच्या नशिबी अवहेलनाच आलीय. दुष्काळाला कंटाळून नवी मुंबईत आलेल्या लोकांना शासनान रेशनकार्ड दिलं खरं पण त्या कार्डावर धान्यच मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.
Jun 5, 2012, 09:22 AM IST