मराठवाड्यात दुष्काळ, आश्वासनांचा पाऊस
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना, आश्वासानांचा मात्र पाऊस पडताना दिसतोय. गेल्या महिनाभरात शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत सर्वच सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठवाड्याचा दौरा केलाय. मात्र या दौ-यांत दुष्काळग्रस्तांना पदरात पडलीय फक्त निराशाच....
Mar 5, 2013, 06:28 PM ISTदुष्काळग्रस्त गावात आनंदाचे झरे!
मावळच्या कुशीत वडेश्वरच्या डोंगरावर विसावलेली सटवाईवाडी. पावसाळ्याचे दिवस वगळता आठही महिने पाचवीला पुजलेली पाणीटंचाई... पण आज या गावचं चित्र पालटलय. टाटा मोटर्सच्या सुमंत मुळगावकर फौंडेशनने वर्षभरापूर्वी एका जिवंत झ-याचा आधार घेत तळे खोदायला सुरुवात केली. गावक-यांनीही श्रमदान केले. अन् बघता बघता तळे उभे राहिले…
Mar 4, 2013, 12:22 AM ISTछगन भुजबळ दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर
दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी आलेल्या छगन भुजबळांनी अधिका-यांना चांगलंच धारेवर धरलं...यावेळी त्यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचाही प्रयत्न केला..
Mar 3, 2013, 11:50 PM ISTदुष्काळ निवारणासाठी राज ठाकरे पुढे सरसावले....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांच्या ह्या दौऱ्यात त्यांनी राजकीय नेत्यांवर केलेल्या टीकांमुळे त्यांचा हा दौरा चांगलाच रंगतो आहे.
Mar 1, 2013, 03:26 PM ISTदुष्काळावर राष्ट्रवादी काँग्रेसची बनवाबनवी
दुष्काळग्रस्तांना मदत उभारण्यासाठी राष्ट्रवादी दुष्काळग्रस्त सहायता अभियान सुरू केलंय. यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पुस्तिकेत छापण्यात आलेली दुष्काळग्रस्तांची छायाचित्रे आफ्रिकेतल्या देशांमधील वापरण्यात आल्याचं उघड झालंय.
Feb 25, 2013, 11:57 PM ISTदाणापाण्याचा घोर, स्थलांतर करती मोर
अवघा महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतोय. सगळीकडं पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील मोराच्या चिंचोलीची परिस्थितीही वेगळी नाही. पाण्याच्या दूर्भिक्षामुळं इथल्या मोरांवरही स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे.
Feb 18, 2013, 05:55 PM ISTदुष्काळही आणि अवकाळी पाऊसही
राज्यात एकीकडे दुष्काळाची धग वाढत असताना उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस पडला आहे.
Feb 14, 2013, 09:21 PM ISTविठुरायाचं देवस्थान दुष्काळग्रस्तांना मदत करणार का?
पंढरपूरचा विठुराया प्रचंड श्रीमंत... भक्तांच्या प्रेमाची श्रीमंतीही त्याला भरभरुन मिळाली आहे आणि पैशानंही अतिशय श्रीमंत देवस्थान. आजच्या घडीला विठ्ठलाच्या खजिन्यात 70 ते 80 कोटी सहज आहेत.
Feb 14, 2013, 06:44 PM ISTशाही विवाह : जाधव यांनी मागितली माफी
नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही थाटात विवाह केला. राज्यात दुष्काळ असताना लग्नात पैशाची उधळपट्टी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानउघडणी करताच जाधव यांनी माफी मागून आपल्या कुवतीप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदत करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.
Feb 14, 2013, 04:43 PM ISTभास्कर जाधवांना शरद पवारांचा घरचा आहेर
दुष्काळात लग्नसोहळ्यावर पैसा उधळणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
Feb 14, 2013, 01:30 PM ISTपाहा... दुष्काळात करपणाऱ्या जनतेच्या मंत्र्यांचा थाट!
एकीकडं दुष्काळानं महाराष्ट्र होरपळत असताना दुसरीकडं कोकणातील राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधवांनी मात्र आपल्या मुला-मुलींच्या लग्नावर लाखो रुपयांचा चुराडा केलाय.
Feb 14, 2013, 08:09 AM ISTजितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी सिडको, म्हाडा आणि एमएमआरडीएने 50 टक्के निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलंय.
Feb 13, 2013, 09:19 PM ISTनाशिकमध्ये गारांचा पाऊस, पिकांचं नुकसान
राज्यात विविध ठिकाणी अचानक पावसानं दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. तर कर्जत, खालापूर आणि लोणावळ्यातही सरी बरसल्या आहेत.
Feb 11, 2013, 09:47 PM ISTमंत्र्यांचे दौरे मराठवाड्याला पुरेसे?
दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय. अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरु केलंय. मात्र, दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहे ते सरकारी मदतीकडे.
Feb 10, 2013, 06:45 PM IST'दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्रापुढे पसरणार हात'
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपण केंद्राला साकडं घालणार आहोत, असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मराठवाड्याला दिलंय. ते जालन्यात बोलत होते.
Feb 10, 2013, 05:21 PM IST